नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:34 IST2025-12-08T15:33:07+5:302025-12-08T15:34:20+5:30
India-Russia Submarine Deal: रशिया पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक यासेन-क्लास न्यूक्लियर अटॅक सबमरीनचे तंत्रज्ञान भारतला देण्यास तयार झाला आहे.

नौदलाची ताकद वाढणार; भारताला रशियाकडून मिळणार अणुउर्जेवर चालणारी अत्याधुनिक पाणबुडी
India-Russia Submarine Deal: भारत आणि रशिया यांच्यात अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांबाबत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता नवीन वळण मिळाले आहे. ताज्या अहवालांनुसार, रशिया आपली जगप्रसिद्ध Yasen-Class न्यूक्लियर सबमरीन भारताला देण्यास तयार असून, त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण स्टेल्थ, सेन्सर व शस्त्र प्रणाली तंत्रज्ञानदेखील देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. हा करार प्रत्यक्षात आला, तर भारतीय नौदलासाठी हे खूप फायदेशीर ठरणार नाही.
अहवालांनुसार रशिया ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी तयार असल्याचे सांगितले जाते, त्यात उच्चस्तरीय स्टेल्थ स्ट्रक्चर, आधुनिक सेन्सर नेटवर्क आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे एकीकरण तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
यासेन-क्लास ही जगातील अत्यंत शांत आणि बहुउद्देशीय क्षमतांनी सज्ज असलेल्या पाणबुड्यांपैकी एक मानली जाते. खोल समुद्रात वेगाने प्रवास करण्याची क्षमता, तसेच दीर्घ पल्ल्याच्या विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणामुळे रशियन नौदल तिला आपली सर्वात प्रभावी पाणबुडी मानते. भारताला हे तंत्रज्ञान मिळाले, तर भविष्यात भारतीय नौदलाची ताकद नक्कीच वाढणार आहे.
भारताचा Project-77 SSN
भारत सध्या Project-77 SSN या महत्वकांशी प्रकल्पावर काम करत आहे. या अंतर्गत आठ आधुनिक अणू पाणबुड्या तयार करत आहे. दोन पनडुब्ब्या जवळपास तयार अवस्थेत, तर उर्वरित पाणबुड्यांचे काम अपेक्षित गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ₹1.2 लाख कोटी आहे. विशेष म्हणजे, याचे डिझाईन पूर्णपणे भारतीय आहे. जर रशियन तंत्रज्ञानाची याला मदत मिळाली, तर याची क्षमता अनेक पटींनी वाढेल आणि भारताचा SSN कार्यक्रम जगातील सर्वात सक्षम प्रकल्पांपैकी एक ठरेल.
Yasen-Class; काय आहे खासियत?
लांबी: सुमारे 139 मीटर
शांत आणि स्टेल्थ-ऑप्टिमाइझ्ड डिझाईन
दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता
हायपरसोनिक Zircon
अँटी-शिप Oniks
लँड-अटॅक Kalibr
दहा टॉरपीडो ट्यूब, जड वजनाचे टॉरपीडो वाहून नेण्याची क्षमता
ही वैशिष्ट्ये तिला जगातील अत्याधुनिक अणु पनडुब्बी श्रेणीत स्थान देतात.
भारताची समुद्री शक्ती वाढेल
जर यासेन-क्लासशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण खरोखरच आकार घेत असेल, तर भारतीय नौदलाची पाणबुडी क्षमता नव्या उंचीवर पोहोचू शकते. यामुळे भारत अत्याधुनिक अणु-पनडुब्ब्या तयार करण्यात स्वयंपूर्ण होईल आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा सामरिक प्रभाव आणखी मजबूत होईल.
पाकिस्तानची पाणबुडी क्षमता
जिथे भारत SSN सारख्या उच्च दर्जाच्या अणु-पाणबुड्यांकडे वाटचाल करत आहे, तिथे पाकिस्तानची क्षमता अद्याप डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर आधारित आहे. NTI (Nuclear Threat Initiative) च्या माहितीनुसार पाकिस्तानकडे Agosta मालिकेतील काही AIP सबमरीन आहेत.