शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

अमेरिकेचा हेतू 'तसा' नव्हता; S-400च्या करारानंतर ट्रम्प यांचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:57 IST

भारत आणि रशियादरम्यान आज महत्त्वपूर्ण असलेल्या S-400 या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन- भारत आणि रशियादरम्यान आज महत्त्वपूर्ण असलेल्या S-400 या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विरोध करणा-या अमेरिकेनं या प्रकरणावर अत्यंत मवाळ भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, रशियाच्या आडमुठ्या भूमिकेला पायबंद घालण्यासाठी बंदी घालण्याची धमकी दिली. रशियातील डिफेन्स सेक्टरमधील पैशाच्या प्रवाहाला थांबवलं पाहिजे. रशियावर बंदी घालण्याचा उद्देश मित्र देश आणि भागीदारांच्या सैन्य क्षमतेला डॅमेज करण्याचा नव्हता, आम्ही कोणतेही पूर्वग्रहदूषित ठेवून बंदी लादत नाही. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मित्र देशांना रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यास बंदी घालण्याची धमकी देत आहे. तरीही आज भारत आणि रशियानं एस-400 मिसाइल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेनं स्वतःच्या भूमिकेत बदल केला आहे. तर काही दिवसांपर्यंत अशी चर्चा होती की, भारतानं जर रशियाशी हा करार केला तर अमेरिका नाराज होईल, अमेरिका शस्त्रास्त्र बंदीच्या कायद्या(CAATSA) चा वापर करून रशियाकडून इतर देशांना शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर बंदी घालू शकते. परंतु असं काहीही झालं नाही. उलट अमेरिकेच्या स्वतःच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूच्या विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्यातील जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक स्वरूप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन