कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 08:50 IST2025-05-09T08:48:46+5:302025-05-09T08:50:37+5:30

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय नौदलाकडून पहिल्यांदाच कराचीसारख्या प्रमुख शहरावर हल्ला करण्यात आला आहे

India-Pakistan War: Karachi-Islamabad connection broken; India INS Vikrant launches major attack on Pakistan karachi port | कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला

कराची - पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या सीमाभागातील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत ड्रोन, मिसाईल हल्ले हाणून पाडले. त्यातच भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

१९७१ नंतर पहिल्यांदाच नौदलाचा कराचीवर हल्ला

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय नौदलाकडून पहिल्यांदाच कराचीसारख्या प्रमुख शहरावर हल्ला करण्यात आला आहे. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. सैन्य सूत्रांनुसार, INS विक्रांत आणि अन्य युद्धनौकांनी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या नौदल तळ, इंधन डेपो आणि इतर प्रमुख सैन्य छावण्यांना टार्गेट केले. या हल्ल्यात अचूक टिपणाऱ्या मिसाईलसोबत समुद्रात लांबून डागणाऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. 

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

आता भारत सहन करणार नाही

भारताने दिलेले हे केवळ उत्तर नाही तर पाकिस्तानला स्पष्ट शब्दात आता भारत सहन करणार नाही, चोख उत्तर देईल असा संदेश दिला आहे. कराचीवर हल्ला करून भारताने पाकिस्तानची अर्थव्यवस्था, सैन्य क्षमता आणि मनोधेर्य खच्चीकरण केले आहे. कराची ना केवळ पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख केंद्र आहे तर तेल आणि इंधन पुरवठ्याचेही महत्त्वाचे स्थान आहे. भारताने कराचीवर हल्ला करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. ज्याचे भविष्यात मोठे परिणाम पाहायला मिळतील असं संरक्षण तज्ज्ञ निवृत्त वाइस एडमिरल आर.के. सिंह यांनी सांगितले.

किती मोठे नुकसान?

पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर भारतीय नौदलाने हल्ला केला. त्यावेळी प्रमुख जहाजे, युद्ध साहित्याचे मोठे नुकसान पाकिस्तानला सहन करावे लागले. हल्ल्यामुळे इंधन डेपोला आग लागली आणि मोठे स्फोट घडले. इथली यंत्रणा उद्ध्वस्त झाली. ज्यामुळे कराची आणि इस्लामाबादचा संपर्क तुटल्याची माहितीही पुढे आली आहे.

Web Title: India-Pakistan War: Karachi-Islamabad connection broken; India INS Vikrant launches major attack on Pakistan karachi port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.