India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:00 IST2025-05-08T14:59:22+5:302025-05-08T15:00:19+5:30

India Pakistan War : गुरुवारी दुपारी पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारताविरोधात नवीन दावा केला. भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला.

India Pakistan War India attacked 9 cities from Lahore to Karachi with Israeli drones Scared Pakistan claims | India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा

India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा

India Pakistan War ( Marathi News ) :  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, काल भारतानेपाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने आपल्या सीमेवरून क्षेपणास्त्रे डागली होती, आता आज पाकिस्तान लष्कराने पत्रकार परिषद घेऊन नवीन दावा केला आहे. 'भारताने बुधवारी रात्रीही अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे, असा दावा केला आहे. भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. हे हल्ले लाहोर, कराची, गुजरांवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली आणि चोर या शहरांमध्ये केल्याचा दावा केला.

गुरुवारी दुपारी पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद  घेतली. यावेळी त्यांनी भारताविरोधात नवीन दावा केला. भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला.

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

आम्ही १२ ड्रोन पाडले

पाकिस्तानी लष्काराने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, आम्ही १२ हार्प ड्रोन पाडले आहेत. हे ड्रोन लाहोर आणि कराचीमध्ये पाडले. यावेळी त्यांनी ड्रोनचे फोटोही दाखवले.  पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे की, भारताची ही कृती गंभीर आहे आणि ती आमच्याविरुद्ध चिथावणी देणारी कृती आहे.

लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतानेपाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे.

Web Title: India Pakistan War India attacked 9 cities from Lahore to Karachi with Israeli drones Scared Pakistan claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.