ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 20:12 IST2025-05-05T20:06:40+5:302025-05-05T20:12:08+5:30
India-Pakistan Tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
India-Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्ताननेभारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आता दोन परदेशी विमान कंपन्यांनीही पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या मार्गाने उड्डाण करणार असल्याचे या विमान कंपन्यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रेंच आणि जर्मन विमान कंपन्या एअर फ्रान्स आणि लुफ्थांसाने पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी या प्रदेशातील त्यांचे कामकाजही स्थगित केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या परदेशी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कंपन्यांनी काय म्हटले?
एअर फ्रान्सने एका निवेदनात म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तानवरून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय एअर फ्रान्सने घेतला आहे. दरम्यान, लुफ्थांसानेही अशाचप्रकारचे निवेदन जारी केले आहे.
दरम्यान, फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि एमिरेट्सची काही विमाने अरबी समुद्रावरुन गेल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्द टाळत आहेत. परंतु या विमान कंपन्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. दरम्यान, विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट शुल्कातून मिळणारा महसूल कमी होईल.