'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:59 IST2025-05-12T16:58:17+5:302025-05-12T16:59:04+5:30
India-Pakistan Tension: पाकिस्तानचे DG ISPR अहमद शरीफ यांनी पाकिस्तानची कट्टरता दाखवणारे वक्तव्य केले आहे.

'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
India-Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरऑपरेशन सिंदूर अंतर्गत तीव्र कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने पाकचे सर्व हल्ले हाणून पाडले. सध्या दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान, पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर अहमद शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने त्यांना विचारले की, आपले सैन्य इस्लामिक शब्द वापरत आहे, जे भारतीय मीडियाला समजत नाहीत. त्या पत्रकाराने उर्दूमध्ये काही ओळीही बोलल्या. यानंतर अहमद शरीफ दावा करतात की, त्यांचे पाकिस्तानी सैन्य एक इस्लामिक सैन्य आहे. तसेच, जिहाद करणे हे त्यांचे काम आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाकिस्तान अनटोल्ड नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे.
‘Pakistani Army is an Islamic army, & Jihad (war against non-Muslims) is our motto & drives us.’
— Pakistan Untold (@pakistan_untold) May 12, 2025
– DG ISPR, Pakistan
Ever heard of any Indian Armed Forces official speaking to Muslims like that? But, as per liberals, extremists exist on both sides.pic.twitter.com/6Czve2qWhB
विशेष म्हणजे, पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर अहमद शरीफ यांनी असे कट्टरतावादी विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी दावा केला होता की, त्यांचे वडील सुलतान बशीरुद्दीन महमूद यांचे दहशतवाद्यांशी विशेष संबंध होते. सुलतान बशीरुद्दीन महमूद यांचे नाव एकेकाळी पाकिस्तानच्या वैज्ञानिक समुदायात प्रतिष्ठेने घेतले जात असे. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण कट्टरतावादाकडे असलेल्या त्यांच्या कलमुळे ते एक वादग्रस्त आणि धोकादायक व्यक्तिमत्व बनले. (व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकमत या व्हिडिओची पुष्टी करत नाही.)