Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:33 IST2025-05-14T11:32:52+5:302025-05-14T11:33:27+5:30
India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेणाऱ्या अमेरिकेचे दावे भारताने फेटाळले आहेत.

Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
India-Pakistan Tension : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध विकोपाला पोहोचले. चार दिवस दोन्ही देशांमध्ये भीषण संघर्ष पेटला, पण अखेर 10 मे रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या युद्धविरामाचे संपूर्ण श्रेय घेत आहेत. अशातच आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांना पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही.
#WATCH | "... I can only reiterate that we welcome the ceasefire reached between India and Pakistan this weekend. We commend both Prime Ministers for choosing the path of peace... We also want to encourage direct communication between the parties...," says Tommy Pigott, Principal… pic.twitter.com/kIIjNAOlIt
— ANI (@ANI) May 13, 2025
पत्रकार परिषदेत टॉमी पिगॉट यांनी दोन्ही शेजारी देशांमधील थेट संवादाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, पाकिस्तानकडून अमेरिकेला दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याचे किंवा दहशतवादी गटांना पाठिंबा देणे थांबवण्याचे कोणतेही आश्वासन मिळाले आहे का, असे विचारले असता, पिगॉट म्हणाले, मी फक्त एवढेच सांगू शकतो की, भारत आणि पाकिस्तानमध्ये या आठवड्यात झालेल्या युद्धविरामाचे आम्ही स्वागत करतो. शांतीचा मार्ग निवडल्याबद्दल आम्ही दोन्ही पंतप्रधानांचे कौतुक करतो. आम्हाला दोन्ही बाजूंमध्ये थेट संवादाला प्रोत्साहन द्यायचे आहे.
भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना व्यापाराची धमकी देऊन युद्धविराम करण्यास भाग पाडल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातोय. पण, हा दावा भारताने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.