India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:19 IST2025-05-10T13:14:44+5:302025-05-10T13:19:31+5:30

Indian Army destroyed Terrorist Launchpads Video: पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष वाढलेला असतानाच भारतीय लष्कराने सीमारेषेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हे अड्डे कशा पद्धतीने उडवण्यात आले, याचाही व्हिडीओ आता समोर आला आहे. 

India Pakistan: Indian Army destroys many terrorist launch pads near LoC; Video shown | India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला

India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला

India Pakistan Latest Update: ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने सुरू केलेले हवाई हल्ले ९ आणि १० मेच्या रात्रीही सुरूच राहिले. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी हल्ल्याची तीव्रता वाढवली. पश्चिम सीमेवरील चार राज्यातील विविध ठिकाणांवर ड्रोन्स, क्षेपणास्त्र आणि हायस्पीड मिसाईलही डागण्याचा प्रयत्न झाले. पण, भारतीय लष्कराने पाकिस्तानची अस्त्रे कचऱ्यासारखी खाली पाडली. दरम्यान, एकीकडे पाकिस्तान लष्कराकडून हल्ले होत असताना दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅड्सवरही हालचाली दिसून आल्या. भारतीय लष्कराने एलओसीवरील दहशतवाद्यांचे अड्डे उखळी तोफा डागत भस्म केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एलओसीवर पाकिस्तानच्या हद्दीत अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स आहेत. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत असताना दहशतवाद्यांच्या तळावरूही भारतात ड्रोन्स हल्ले करण्यात आले. दहशतवाद्यांचे सीमेवरील अनेक पॅड्स लष्कराने उडवले. 

भारताचा दहशतवाद्यांच्या पॅड्सवर स्ट्राईक

भारतीय लष्कराकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यात एलओसीवर पाकिस्तानच्या हद्दीत असलेले दहशतवाद्यांचे अड्डे दिसत आहे. याच लॉन्चिंग पॅड्सचा वापर भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी, भारतीय जवानांवर हल्ले करण्यासाठी आणि सीमेवरील लष्करी संघर्ष पेटलेला असताना भारतातील नागरिकांवर हवाई हल्ले करण्यासाठी केला जात आहे. 

वाचा >>भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना निशाणा बनवत हल्ले केले. यात अनेक ठिकाणचे दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स भूईसपाट झाल्याचे दिसत आहे. 

पाकिस्तानी लष्कराच्या तळांनाही केलं लक्ष्य

पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर भारतानेही त्याच भाषेत उत्तर दिले. माहिती लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनीच याबद्दल माहिती दिली. 

"भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या हल्ल्यांना ताबडतोब आणि नियोजन पद्धतीने उत्तर दिले. तांत्रिक ठिकाणं, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर्स, पाकिस्तान लष्कराच्या रडार साईट्स आणि लष्कराच्या शस्त्र भंडारावर हल्ले केले. शोरकोट येथील रफिकी हवाई तळ, चकवाल येथील मुरीद हवाई तळ, रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ, जुन्निया या पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हवाई अस्त्र आणि लढाऊ विमानांतून प्रहार करण्यात आला", असे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले. 

"पसूरमधील रडार ठिकाण, सियालकोटच्या हवाई दलाच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या कारवाई दरम्यान, भारताने नागरिक ठिकाणांचं नुकसान कमीत कमी होईल याची काळजी घेतली", असेही कर्नल कुरैश यांनी सांगितले.

Web Title: India Pakistan: Indian Army destroys many terrorist launch pads near LoC; Video shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.