India Pakistan Conflict ( Marathi News ) : पहलमाग दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. काल पाकिस्तानने अचानक हल्ले वाढवले, या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच वाईट आहे, पाकिस्तान आता जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून कर्जासाठी आवाहन करत आहे.
पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाने 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
वाढत्या युद्ध आणि घसरत्या शेअर बाजाराच्या पार्श्वभूमीवर, आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करण्याचे आवाहन करतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या पोस्टमध्ये राष्ट्राला खंबीर राहण्याचे आवाहन करण्यात आले. पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठक आहे.
आयएमएफ व्यवस्थापनाचा भाग असल्याने भारत देखील या बैठकीत भाग घेईल आणि येथेही पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची कोणतीही संधी सोडणार नाही.
भारत विरोध करणार
दरम्यान, भारताच्या विरोधाला न जुमानता, पाकिस्तानला पॅकेज देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. कारण आयएमएफचे दोन सर्वात मोठे भागधारक अमेरिका आणि चीन यांच्याकडून कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला आर्थिक पॅकेज देणे म्हणजे जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणे असे भारत सदस्य देशांना बैठकीत दाखवून देईल.
भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या सीमाभागातील शहरांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत ड्रोन, मिसाईल हल्ले हाणून पाडले. त्यातच भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
१९७१ च्या युद्धानंतर भारतीय नौदलाकडून पहिल्यांदाच कराचीसारख्या प्रमुख शहरावर हल्ला करण्यात आला आहे. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. सैन्य सूत्रांनुसार, INS विक्रांत आणि अन्य युद्धनौकांनी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या नौदल तळ, इंधन डेपो आणि इतर प्रमुख सैन्य छावण्यांना टार्गेट केले. या हल्ल्यात अचूक टिपणाऱ्या मिसाईलसोबत समुद्रात लांबून डागणाऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला.