India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:22 IST2025-05-09T09:20:59+5:302025-05-09T09:22:01+5:30
India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे.

India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
India-Pakistan Conflict: मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
मीर यार बलोच यांनी स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान पाठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी भारताकडून दिल्लीत बलुचिस्तानसाठी दूतावासाची मागणीही केली आहे.
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
पोस्टमध्ये काय आहे?
मीर यार बलोच यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो."
To the people of Balochistan: The time has come to claim your freedom. As we bring an end to Pakistan, rise up, strike, and take what is rightfully yours.
— Shesh Paul Vaid (@spvaid) May 8, 2025
UN मध्ये मान्यतेची मागणी केली
मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची आणि या मान्यतेला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी डॉलर्स सोडले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.
मीर यार बलोच यांनी पुढे लिहिले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांना त्यांचे शांतता अभियान बलुचिस्तानमध्ये पाठवण्याची आणि पाकिस्तानी कब्जा करणाऱ्या सैन्याला बलुचिस्तानचे क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगण्याची आणि बलुचिस्तानमधील सर्व शस्त्रे आणि मालमत्ता सोडण्यास सांगण्याची विनंती करतो.
बलुचिस्तानबाहेरच्यांनी तात्काळ बलुचिस्तान सोडावे
"सेना, फ्रंटियर कॉर्प्स, पोलिस, मिलिटरी इंटेलिजेंस, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलुचिस्तान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन अंतरिम सरकारची घोषणा केली जाईल", असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.