भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:09 IST2021-06-01T14:05:22+5:302021-06-01T14:09:00+5:30

वायू निर्यात करण्यासाठी पाकिस्तानमधील कराचीपर्यंत पाईप लाईन टाकणार; २.२५ अब्ज डॉलरचा खर्च येणार

India Friend Russia Sign Gas Pipeline Deal With Pakistan Vladimir Putin might visit pakistan | भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना

भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना

इस्‍लामाबाद: भारताचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला चीनकडून कायम मदत दिली जाते. भारताला शह देण्यासाठी, भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानला सातत्यानं मदत करतो. मात्र आता भारताचा जुना आणि खास मित्र मानल्या जाणाऱ्या रशियानं पाकिस्तानसाठी खजिना उघडला आहे. रशियातील कासूर ते पाकिस्तानमधील कराचीपर्यंत एक पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठीच्या करारावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे.

चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात

पाकिस्तान आणि रशियामधील प्रकल्प दोन देशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कराचीमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. या वायू वाहिनीचं नाव आधी उत्तर-दक्षिण वायूवाहिनी असं होतं. आता त्याला पाकिस्तान वाफ वायू वाहिनी असं नाव देण्यात आलं आहे. 

शीतयुद्ध काळात चीन आणि रशियामधील संबंध ताणले गेले होते. मात्र त्यावेळी निर्माण झालेली कटुता कमी करून संबंध सुधारण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वायू वाहिनीसाठी कराराला २०१५ मध्येच मूर्त स्वरुप मिळालं होतं. मात्र रशियन कंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादल्यानं वायू वाहिनीचं काम बारगळलं. पाकिस्तान वाफ वायू वाहिनीची लांबी ११२२ किलोमीटर असणार आहे.

दोन्ही देशांनी मिळून प्रकल्पातील अडथळे दूर करून नवा करार केला आहे. यानुसार वायू वाहिनीत ७४ टक्के हिस्सा पाकिस्तानचा असेल. याआधी संपूर्ण वाहिनीचं काम रशिया करणार होता. त्यासाठी २.२५ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. वायू वाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर रशियातून पाकिस्तानला वायूची निर्यात केली जाईल.

Web Title: India Friend Russia Sign Gas Pipeline Deal With Pakistan Vladimir Putin might visit pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.