भारतरशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफवर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्यावेळी ट्रम्प यांनी हा दावा केल. दरम्यान, आता या दाव्याला रशियाकडून प्रत्युत्तर आले आहे. 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार कराराच्या घोषणेनंतर भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत', असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिकेकडून टॅरिफ कपातीची घोषणा, पण ट्रम्प यांचा मोठा दावा; भारत आणि रशियाची मैत्री तुटणार?
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, "या विषयावर आम्हाला अद्याप नवी दिल्लीकडून कोणतेही निवेदन मिळालेले नाही. ट्रम्प यांच्या विधानानंतर लगेच रशियाकडून विधान समोर आले आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक देश आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, तो रशियन समुद्री तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार बनला. काही भारतीय रिफायनरीजनी नोव्हेंबरमध्ये निर्बंधांच्या दबावाखाली आयात थांबवली असल्याने, भारताने उच्च पातळीची खरेदी करावी अशी मॉस्कोची इच्छा आहे. डिसेंबरमध्ये भारताची रशियन तेल आयात दोन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आली, तर भारतीय आयातीमध्ये ओपेकचा वाटा ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
अमेरिकेला इशारा
जग"धोकादायक" काळाकडे जात आहे कारण शेवटचा अमेरिका-रशिया अणु करार या आठवड्यात संपत आहे, असा इशारा रशियाने दिला. न्यू स्टार्ट कराराची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, "काही दिवसांत, जग पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक परिस्थितीत असेल." रशियाने कराराच्या काही अटी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. क्रेमलिनने पुढे म्हटले आहे की जगातील दोन सर्वात मोठ्या अणुशक्तींकडे त्यांची शस्त्रे मर्यादित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी कोणतेही मूलभूत दस्तऐवज शिल्लक राहणार नाहीत.
४५० ड्रोन आणि ७० क्षेपणास्त्रे डागण्यात आली
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की, रशियाने रात्रीच्या वेळी केलेल्या मोठ्या हल्ल्यात युक्रेनमध्ये सुमारे ४५० लांब पल्ल्याचे ड्रोन आणि विविध प्रकारची ७० क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हा हल्ला अमेरिकेच्या मध्यस्थीने संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे दोन्ही देशांमधील चर्चेच्या एक दिवस आधी झाला, याचा उद्देश जवळजवळ चार वर्षांपूर्वी रशियाने सुरू केलेले पूर्ण प्रमाणात युद्ध संपवणे आहे.