चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:53 IST2025-08-26T13:53:10+5:302025-08-26T13:53:37+5:30

India-China-Russia: पंतप्रधान मोदींचा चीन दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी खूप महत्वाचा आहे.

India-China-Russia: Show of strength in China; Modi, Putin and Jinping on the same platform, America will jealous | चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची

चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची

India-China-Russia: अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर हा कर लादला आहे. मात्र, भारत आपल्या भूमिकेवर ठाम असून, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, अमेरिकेला शह देण्यासाठी भारत चीनसोबतही आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत.

मोदी-जिनपिंक-पुतिन एकाच मंचावर
चीनच्या तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत २० देशांचे प्रमुख एका व्यासपीठावर एकत्र येतील. यामध्ये पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे. हे दिग्गज एकत्र आल्यानंतर ट्रम्प यांची झोप नक्कीच उडणार आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि इतर नऊ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख देखील या दोन दिवसांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील.

संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली जाईल
शिखर परिषदेचे आयोजन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग करत आहेत. या शिखर परिषदेदरम्यान, सर्व देश संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करू शकतात. याशिवाय, सर्व सदस्य देश एससीओ विकास धोरणाला मान्यता देतील आणि सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी उपाययोजनांवर देखील चर्चा करतील. या घोषणेत अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला योग्य उत्तर दिले जाऊ शकते, अशी चर्चाही आहे.

शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांची यादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी - भारत
व्लादिमीर पुतिन - रशिया
शी जिनपिंग - चीन
मसूद पेझेश्कियान - इराण
उपपंतप्रधान इशाक दार - पाकिस्तान
रेसेप तय्यिप एर्दोगान - तुर्की
पंतप्रधान अन्वर इब्राहिम - मलेशिया
सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस - संयुक्त राष्ट्र

पंतप्रधान मोदींची उपस्थिती खूप महत्वाची 
भारतातील चीनी राजदूत शु फेहोंग यांनी गुरुवारी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचा चीन दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी खूप महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला चीन खूप महत्त्व देतो.  चीन आणि भारताचा एक कार्यगट हा दौरा यशस्वी करण्यासाठी तयारी करत आहे. विशेष म्हणजे, या शिखर परिषदेच्या माध्यमातून चीन अमेरिकेला आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करेल. 

Web Title: India-China-Russia: Show of strength in China; Modi, Putin and Jinping on the same platform, America will jealous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.