India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 08:56 AM2020-06-17T08:56:27+5:302020-06-17T10:29:31+5:30

India China Face Off: ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे, असे म्हटले आहे.

India China Face Off: Indian military arrogance; China ready for big war; China's language | India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

googlenewsNext

बिजिंग : लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक झटापटीचे खापर चीनने भारतावरच फोडले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव हा भारतामुळेच झालेला आहे. भारतीय सैन्याचा घमेंडीपणा आणि दुस्साहसामुळे हे घडले आहे. सैन्यांमधील संघर्ष दोन्ही देशांसाठी योग्य नाहीय. आम्ही मोठ्या युद्धासाठी तयार असून त्याचा फायदाही आमच्याबाजुला आहे, असे म्हटले आहे. 


ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे. कारण चीनचे सैन्य भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने दोन गैसमज करून घेत सीमेच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. यामध्ये पहिला अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे चीन भारतासोबत वाईट संबंध ठेवू इच्छित नाहीय. यामुळे चीन भारताने उकसावल्यास त्याला उत्तर देण्याची इच्छा ठेवत नाही. 


दुसरा गैरसमज असा की काही लोकांना वाटते की, भारताच्या सैन्याची ताकद चीनपेक्षा जास्त आहे. या गैरसमजांमुळेच भारताच्या विचारांना प्रभावित केले आहे. पण चीन आणि भारताच्या तकदीमध्ये खूप अंतर आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. 


गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यादरम्यान झालेल्या हाणामारीमध्ये दोन्ही बाजुच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यावरून सध्या दोन्ही देशांमधील सीमावाद नियंत्रणात नसल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर दोन्ही सैन्यदलांनी संयम ठेवला आहे. दोन्ही देश चर्चेतून तणाव निवळू पाहत आहेत. चीनने आपल्य़ा सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केलेला नाही, कारण पुन्हा दोन्ही देशांमध्ये संघर्ष होईल. 


चीनच्या जनतेने विश्वास ठेवावा

भारतासोबतच्या सीमावादाच्य़ा मुद्द्यावर चीनच्या जनतेने पीपल्स लिबरेशन आर्मीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सीमा वाद सोडविण्यासाठी चीनची अखंडता आणि राष्ट्रीय हित जपले जाणार आहे. चीनकडे त्यांच्या प्रत्येक इंच जमिनीची सुरक्षा करण्याची ताकद आणि समजूतदारपणा आहे. चीनविरोधातील कोणत्याही रणनितीला यशस्वी होऊ दिले जाणार नाही. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

Web Title: India China Face Off: Indian military arrogance; China ready for big war; China's language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.