शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:14 IST

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती इम्रान खान सरकारमधील मंत्री शिरीन मजारी यांनी दिली आहे. हा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असून तो लवकरच कॅबिनेटमध्ये मांडला जाईल, असंही मजारी यांनी सांगितलं. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला काश्मीर प्रश्न सोडवायचा आहे. काश्मीरचा तिढा सुटावा, ही पक्षाची इच्छा असल्याचं मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 'हा प्रस्ताव जवळपास तयार झाला असून आणखी आठवड्याभरात त्याचं काम पूर्ण होईल. यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल. मात्र या प्रस्तावात नेमकं काय आहे, याची माहिती माझ्याकडे नाही,' असं मजारी म्हणाल्या. इम्रान खान यांनी निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर भारतासोबत चांगले संबंध राखण्याची भाषा केली आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी याबद्दल कोणतेही स्पष्ट संकेत दिले नव्हते. सीमारेषेवर शांतता राखण्याची भाषा करणाऱ्या इम्रान यांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी इम्रान खान यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी दहशतवादी संघटनांना आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल इम्रान खान यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद