पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 16:16 IST2022-02-11T16:15:00+5:302022-02-11T16:16:45+5:30

इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी केलं तिसरं लग्न. त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री आहे.

imran khan pti mna aamir liaquat announces third marriage with a 18 year girl social media instagram | पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी

पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी

पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पीटीआयचे खासदार आणि लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरे लग्न केले आहे. ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. सध्या पाकिस्तानात हा चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनी बुधवारी विवाह केला आणि याची माहिती आमिर लियाकत हुसैन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. त्याच दिवशी आमिर यांच्या दुसऱ्या पत्नीनंही त्यांना तलाख दिला. 

"मी १८ वर्षीय सईदा दानिया शाह हिच्यासोबत विवाह केला आहे. ती दक्षिण पंजाबच्या लोधरण येथील एका प्रतिष्ठित घरातील सदस्य आहे," असं त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबत त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत फोटोही शेअर केला आहे. बुधवारीच आमिर यांची दुसरी पत्नी अभिनेत्री टुबा आमिर हीनं आपण तलाख दिल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे दिली होती. गेल्या १४ महिन्यांपासून आपण वेगळे राहत असल्याचंही तिनं म्हटलं होतं.



आमिर यांचा दुसरा विवाह २०१८ मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांची पहिली पत्नी सईद बुसरा इकबाल हीनं आमिर यांनी आपल्याला फोनवरून तलाख दिल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. परंतु २०२१ मध्ये आमिर यांनी आपला विवाह केवळ टुबा हिच्याशीच झाला असल्याचं म्हटलं होतं.

Web Title: imran khan pti mna aamir liaquat announces third marriage with a 18 year girl social media instagram