शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बापरे! इम्रान खान यांनीच फोडला पाकिस्तानात 'पेट्रोल बॉम्ब'; इंधन दरांत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:54 IST

इम्रान खान यांच्या इंधन दरात मोठी वाढ करण्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उतरले आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी(पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी हा कसला निर्णय आहे असा सवाल केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने आधीच महागाईमध्ये पिचलेल्या जनतेला मोठा शॉक दिला आहे. एकाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एवढ्या वाढविल्या आहेत की दरांनी शंभरी गाठली आहे. 

पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा इंधनाचे दर कमी होते. पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये थेट 25.58 पाकिस्तानी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पाकिस्तानात आता पेट्रोलची किंमत 100.10 रुपये प्रतिलीटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 21 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे डिझेल 101.46 रुपयांना विकले जाणार आहे. पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा डिझेलची किंमत जास्त झाली आहे. तर रॉकेलचीही किंमत 24 रुपये प्रतिलीटरने वाढविण्यात आली आहे. 

नवीन दर जाहीर करताच अनेक शहरांतील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार जादातर पेट्रोलपंपांवर तांत्रिक समस्या असल्याचे बोर्ड लटकविण्यात आले आहेत. तर काही पेट्रोलपंपांवर कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. इंधनाच्या दरात कमालीची वाढ केल्यामुळे विरोधी पक्षानेही टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. 

गरीबी नाही, गरिबांना संपवणारइम्रान खान यांच्या इंधन दरात मोठी वाढ करण्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उतरले आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी(पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी हा कसला निर्णय आहे असा सवाल केला आहे. सरकारच्या अपयशामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याचा अर्थ असा नाहीय की पंतप्रधान इम्रान खान यांनी  तिजोरी भरण्यासाठी गरिबांना लुटावे. निवडून दिलेल्या पंतप्रधानांनी मनमानी करू नये. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे खासदार आसिफ किरमानी यांनी सांगितले की, हे पेट्रोल बॉम्ब आहे. जगातील इतर देश गरीबी दूर करण्याची पाऊले उचलत आहेत. तर पाकिस्तानी सरकार गरिबांनाच संपवायला उताविळ झाले आहे. भारताच्या एका रुपयाची किंमत पाकिस्तानच्या 2.22 रुपयांएवढी आहे. याचा अर्थ भारतीय मुल्यांमध्ये पाकिस्तानी मुल्याच्या तुलनेत दुपटीहून जास्त आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPetrolपेट्रोलDieselडिझेल