शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

इम्रान खान क्लीन बोल्ड? मित्रपक्ष विरोधकांच्या दारी; सरकार अल्पमतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 07:32 IST

पाकिस्तानमध्ये राजकीय नाट्य, मित्रपक्ष विरोधकांच्या दारी; सरकार अल्पमतात, सोमवार- मंगळवारपर्यंत होणार सत्तेचा फैसला

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राजकीय नाट्य रंगले असून पंतप्रधान इम्रान खान विरोधकांच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होण्याची शक्यता आहे. त्यांचे मित्रपक्ष मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट - पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने पाठिंबा काढत विरोधीपक्षांशी हातमिळवणी केल्याने इम्रान सरकार कोसळणार अशी चर्चा सुरू आहे. सात खासदार असलेल्या या पक्षाने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविले आहे. या महत्त्वाच्या घटनेमुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. आता ते अविश्वास प्रस्तावावरील मतदानानंतर, की त्याच्या आधीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एमक्यूएम-पी या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विरोधी पक्ष पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत मांडणार असलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आम्ही ठरविले आहे. (वृत्तसंस्था)

अविश्वास ठरावावर सोमवारी किंवा मंगळवारी नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र, तिथे पराभव होण्याच्या आधीच मित्रपक्ष एमक्यूएम-पी या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी जमात-ए-इस्लामी या पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

माझे सरकार पाडण्याचा कट विदेशी शक्तींनी आखला आहे, या आरोपाचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुनरुच्चार केला आहे. इम्रान यांनी एक पत्र पुरावा म्हणून मंत्रिमंडळातील सहकारी व पाकिस्तानातील काही वरिष्ठ पत्रकारांना दाखविले. मात्र, त्या पत्रात नेमका काय तपशील आहे, ती विदेशी शक्ती म्हणजे नेमके कोणते देश, याचा तपशील इम्रान खान यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, लष्करातील उच्चपदस्थ वगळता अन्य कोणाकडेही उघड केलेला नाही. 

संदेश देण्याचा निर्णय रद्द सरकार अल्पमतात गेल्याने पंतप्रधान इम्रान खान यांची बुधवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. इम्रान खान दूरचित्रवाहिनीवरून बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्राला उद्देशून संदेश देणार होते. मात्र, त्यानंतर संदेश न देण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला.

बहुमतासाठी हवा १७२ सदस्यांचा पाठिंबापंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख आहेत. 

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक