"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:37 IST2024-12-20T16:37:26+5:302024-12-20T16:37:51+5:30
Vladimir Putin : रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र...

"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगभरात पॉर्नोग्राफिक सामग्रीच्या लोकप्रियतेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जर आपल्याला यापासून मुक्ती हवी असेल, तर आपल्याला अधिक आकर्षक आणि मनोरंजक सामग्री तयार करावी लागेल. जर आपण असा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला तरच पॉर्न कंटेंटच्या समस्येपासून मुक्त होऊ शकू.
रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र, आपण त्याच्या समोर पर्याय म्हणून अधिक मनोरंजक आणि आकर्षक सामग्री तयार करून देणे, हेही प्रभावी ठरेल. आपण हे करू शकलो तरच युजर पॉर्न साइटवर जाणे टाळेल आणि उपलब्ध पर्यायांकडे जाईल. महत्वाचे म्हणजे, ऑनलाइन पॉर्न सामग्रीची वाढती लोकप्रियता जगभरातील सामाजिक मानदंडांवर प्रभाव टाकत असतानाच पुतिन यांनी हे भाष्य केले आहे.
आपल्या खास अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचे एक अनोखे विधान केले होते. लोकांनी ऑफिसमध्ये लंच अथवा कॉफी ब्रेकदरम्यान सेक्स करायला हवा, यामुळे देशाचा जन्मदर वाढण्यास मदत होईल. रशिया गेल्या अनेक वर्षांपासून घटत्या जन्मदराचा सामना करत आहे. सध्या जगाच्या 2.1 च्या तुलनेत रशियाचा जन्मदर 1.5 ने कमी आहे.
एवढेच नाही तर, गेल्या वर्षी याच संदर्भात बोलताना, लोकांनी किमान आठ मुलांना जन्म द्यायला हवा आणि मोठ्या कुटुंबाची संकल्पना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायला हवी, असे पुतिन यांनी म्हटले होते. तसेच, आपल्या अनेक जाती समुहांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्याकडे कमीत कमी चार ते पाच अथवा याहूनही अधिकम मुले होण्याची परंपरा आहे. तसेच आपल्या आजी-आजोबांच्या काळातही सात-आठ मुले होण्याची परंपरा होती. रशियामध्ये 1990 च्या दशकापासूनच लोकसंख्येत घट दिसत आहे.