शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:26 IST

"इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. 'इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा देशांवर २५ टक्के एवढा टॅरिफ अथवा कर लादला जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

"नियम तात्काळ लागू होईल, बदलला जाणार नाही" -यासंदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर पोस्ट करत, "इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या देशांवर होऊ शकतो थेट परिणाम -असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, चीन, ब्राझील, तुर्की आणि रशिया सारख्या देशांचे इराणशी व्यापारी संबंध आहेत. यामुळे, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा या देशांवर थेट परिणाम होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे,  भारतही इराणसोबत साखर, चहा, औषधे, सूखा मेवा आदी गोष्टींचा इराणसोबत व्यापार करतो. मात्र अद्याप, अमेरिकेने भारतासंदर्भात विशेषत्वाने कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

संवादातून प्रश्न सोडवण्यास अमेरिकेचे प्राधान्य -तत्पूर्वी, अमेरिका इराणी अधिकाऱ्यांसोबत आणि इराण विरोधी नेत्यांसोबतही चर्चा करू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी इराणमध्ये निदर्शकांच्या मृत्यूंसंदर्भातही नाराजी व्यक्त केली होती. तसेच, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी लष्करी कारवाईची धमकीही दिली होती. दरम्यान, सोमवारी, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, संवादातून प्रश्न सोडवण्यास अमेरिकेचे प्राधान्य आहे. हल्ला हा निश्चितपणे एक पर्याय असू शकतो. मात्र, संवादाद्वारे तोडगा काढाण्यास, राष्ट्राध्यक्षांचे प्राधान्य आहे.

तसेच, इराणकडून अमेरिकेला स्पष्ट आणि सुसंगत संदेश मिळत नाहीत. इराण सरकार बाहेर काही वेगळेच सांगत आहे, मात्र, अंतर्गत चर्चेत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. राष्ट्रपती ते संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens 25% Tariff on Countries Trading with Iran

Web Summary : Trump warns countries trading with Iran face 25% tariffs. China, Brazil, Turkey, Russia may be affected. US prioritizes dialogue but military action remains an option.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिका