Elon Musk Tweet: "माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर..."; इलॉन मस्क यांच्या ट्विटमुळे खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 08:13 IST2022-05-09T08:12:35+5:302022-05-09T08:13:15+5:30

मस्क यांचे हे ट्विट फार कमी वेळात प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यांचे हे ट्विट तीन तासांच्या आतच 40 हजारहून अधिक लोकांनी रीट्विट केले आहे.

If i die under mysterious circumstances nice knowin ya tweeted Elon musk | Elon Musk Tweet: "माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर..."; इलॉन मस्क यांच्या ट्विटमुळे खळबळ 

Elon Musk Tweet: "माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर..."; इलॉन मस्क यांच्या ट्विटमुळे खळबळ 

ट्विटर विकत घेतल्यापासून इलॉन मस्क हे सातत्याने चर्चेत आहेत. मात्र, आता ते एका नव्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी 'संशयास्पद परिस्थितीतील मृत्यूसंदर्भात' भाष्य केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर मोठ्या प्रमाणावर रिअ‍ॅक्शन्स येऊ लागल्या आहेत.

Elon Musk यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, 'जर संशयास्पद परिस्थितीत माझा मृत्यू झाला, तर हे nice knowin ya असेल.' Elon Musk यांच्या या ट्विटचा अर्थ स्पष्टपणे कुणालाही समजलेला नाही. मात्र, मस्क येथे Nice Knowin' Ya या गाण्याचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

मस्क यांचे हे ट्विट फार कमी वेळात प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यांचे हे ट्विट तीन तासांच्या आतच 40 हजारहून अधिक लोकांनी रीट्विट केले आहे.

मस्क यांच्या ट्विटवर येतायत गमतीशीर रिअ‍ॅक्शन्स -
इलॉन मस्क यांच्या ट्विटवर युजर्स विविध प्रकारचे रिप्लाय देत आहेत. त्यांच्या या ट्विटला रिप्लाय करत, जगाला आपली (मस्क) अत्यंत आवश्यकता आहे, असे एका युजरने म्हटले आहे.

तर काही युजर्स मस्क यांच्या ट्विटवर गंभीर झाल्याचेही दिसून आले. गमतीतही असा विचार करू नका. आपल्याला आणखी अनेक समस्या सोडवायच्या आहेत, असे एकाने लिहिले आहे.

Web Title: If i die under mysterious circumstances nice knowin ya tweeted Elon musk