रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी सुरुवातीला म्हटले होते की शांततेसाठी युक्रेनला आपला प्रदेश सोडावा लागेल, परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी आपला सूर बदलला आणि युक्रेन रशियाकडून आपला गमावलेला प्रदेश परत मिळवेल असे सांगितले, यावरुन आता पुतिन यांनी टीका केली.
"रशिया कागदी वाघ नाही. जर युरोप त्याला चिथावणी देत आहे असे वाटत असेल तर ते जलद आणि निर्णायकपणे प्रत्युत्तर देईल",असंही पुतिन म्हणाले. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाला कागदी वाघ म्हटले होते.
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
'अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकणार नाही'
तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या दबावावर पुतिन यांनी टीका केली. 'भारत कधीही झुकणार नाही. भारत स्वतःला कधीही अपमानित होऊ देणार नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले ओळखतो. ते स्वतः असे पाऊल उचलणार नाहीत',असेही पुतिन म्हणाले.
पुतिन वाल्दाई चर्चेमध्ये म्हणाले की, रशियन तेलाशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसेल आणि जर पुरवठा खंडित झाला तर तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर जाऊ शकतात.
"जर भारताने आमचा ऊर्जा पुरवठा नाकारला तर त्यांचे निश्चितच नुकसान होईल. मला विश्वास आहे की भारतासारख्या देशातील लोक राजकीय नेतृत्वाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवतील आणि देशाला कोणासमोरही अपमानित होऊ देणार नाहीत. भारतासोबतच्या परस्पर व्यापारातील पेमेंट सिस्टमशी संबंधित समस्या लवकरच ब्रिक्सच्या चौकटीत सोडवल्या जातील, असेही पुतिन म्हणाले.
'रशिया कागदी वाघ कसा बनला'
"रशियन सैन्य युक्रेनमध्ये पुढे जात आहे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संपूर्ण नाटोशी लढत आहे. मग रशिया कागदी वाघ कसा बनला आहे?, असा प्रश्न पुतिन यांनी केला. रशिया कोणत्याही नाटो सदस्य देशावर स्वतःहून हल्ला करेल ही शक्यता पुतिन यांनी फेटाळून लावली. "जर कोणाला वाटत असेल की ते लष्करी क्षेत्रात रशियाशी स्पर्धा करू शकतात, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत, असा इशाराही पुतिन यांनी दिला.
Web Summary : Putin criticized Trump and warned Europe against provocation, promising a strong response. He defended India's right to buy oil, asserting Modi wouldn't yield to US pressure. Putin also dismissed claims of Russia being a 'paper tiger'.
Web Summary : पुतिन ने ट्रम्प की आलोचना की और यूरोप को उकसाने के खिलाफ चेतावनी दी, मजबूत प्रतिक्रिया का वादा किया। उन्होंने भारत के तेल खरीदने के अधिकार का बचाव किया और कहा कि मोदी अमेरिकी दबाव में नहीं झुकेंगे। पुतिन ने रूस को 'कागजी बाघ' बताने के दावों को भी खारिज कर दिया।