'मैं बॉर्डर तोडकर भारत में घुस जाऊंगा और हिंदुओं को...', बांगलादेशात कोण पसरवतंय असा द्वेष? कुठून मिळते ही शिकवण? हेट स्पीच व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:37 IST2025-07-11T14:36:20+5:302025-07-11T14:37:33+5:30
या व्हिडिओमध्ये संबंधित युवक हिंदूंबद्दल कशा प्रकारे गरळ ओकत आहे, हे दिसत आहे...

'मैं बॉर्डर तोडकर भारत में घुस जाऊंगा और हिंदुओं को...', बांगलादेशात कोण पसरवतंय असा द्वेष? कुठून मिळते ही शिकवण? हेट स्पीच व्हायरल
बांगलादेशातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक युवक हिंदूंना मारण्याची भाषा बोलत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया पॅलेटफॉर्म एक्सवर @pakistan_untold ने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित युवक हिंदूंबद्दल कशा प्रकारे गरळ ओकत आहे, हे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये संबधित युवक म्हणत आहे, "जर भारतात कुण्याही मुस्लीम व्यक्तीला त्रास दिला गेला अथवा पुन्हा मशिदी तोडल्या गेल्या तर, मी बॉर्डर तोडून भारतात शिरेन आणि हिंदूंची कत्तल करेन."
या बांगलादेशी युवकाच्या अशा द्वेषपूर्ण वक्तव्यांवर अनेक सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने खिल्ली उडवत लिहिले, भाऊ, जरा थांबा नाहीतर नस फाटेल. अरे सिंगल बॅटरी, जर कुणी एक थापड मारली तर, खाली पडशील. आणि तू 'औकाती'पेक्षा जास्त बोलत आहेस. आणखी एका युजरने लिहिले, दुसऱ्याच्या बाबतीत तोंड मारू नये, आधी स्वतः कडे लक्ष द्या.
"...will sl@ughter every Hindu..."
— Pakistan Untold (@pakistan_untold) July 9, 2025
- Malnourished Bangladeshi Islamist, promises Hindu extinction but needs iron tablets for himself
VC: @VHIndus71
pic.twitter.com/vvPBv3wrrp
६३ हजारांहून अधिक वेळा बघितला गेलाय व्हिडिओ -
हा व्हिडिओ ९ जुलै २०२५ रोजी पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत, ६३ हजारांहून अधिक वेळा बघितला गेला आहे. तसेच २ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. यावरून, या व्हिडिओप्रति लोकांचा संताप दिसून येतो. खरे तर, बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून हिंदूंवर अत्यंत अत्याचार होत आहेत आणि त्यांचा छळ सुरू आहे.