"मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:33 IST2026-03-26T11:32:30+5:302026-03-26T11:33:50+5:30

दरम्यान, इराणने ट्रम्प यांचे हे सर्व दावे सपशेल फेटाळून लावले आहेत. "ट्रम्प स्वतःशीच बोलत आहेत का? आम्ही त्यांच्याशी आता किंवा भविष्यात कधीही कोणताही करार करणार नाही," असे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

I was offered to be the Supreme Leader of Iran i says no Donald Trump's sensational statement | "मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले...

"मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले...

"मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले...ट्रम्प म्हणाले, अमेरिकेने इराणचा मोठा पराभव केला आहे. आता इराण तडजोड करू इच्छित आहे. अमेरिकेने इराणसमोर १५ कलमी प्रस्ताव ठेवला, त्यात प्रामुख्याने अणुकार्यक्रम बंद करणे, हिजबुल्लाह सारख्या गटांना पाठबळ देणे थांबवणे आणि होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे, या अटींचा समावेश आहे. 

दरम्यान, इराणने ट्रम्प यांचे हे सर्व दावे सपशेल फेटाळून लावले आहेत. "ट्रम्प स्वतःशीच बोलत आहेत का? आम्ही त्यांच्याशी आता किंवा भविष्यात कधीही कोणताही करार करणार नाही," असे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

इराणचं ५ कलमी प्रत्युत्तर -
सध्या इराणमध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. त्यांचे अनेक बडे नेते मारले गेले आहेत. जुन्या सुप्रीम लीडरच्या हत्येनंतर त्यांच्या मुलाला गादीवर आला आहे. मात्र ते अद्यापपर्यंत सार्वजनिकरीत्या कुठेही दिसल्याचे वृत्त नाही. इराणने अमेरिकेच्या प्रस्तावावर ५ कलमी उत्तर दिले आहे. युद्ध केवळ इराणच्या अटींवरच संपेल, अशी भूमिका इराणे घेतली आहे. 

विशेष म्हणजे, एकीकडे ट्रम्प वाटाघाटी सुरू असल्याचे बोलत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इराणने चर्चेचे सर्व दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील तेलाचे दर आणि पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे,  

Web Title: I was offered to be the Supreme Leader of Iran i says no Donald Trump's sensational statement