'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 23:27 IST2025-10-10T23:26:35+5:302025-10-10T23:27:45+5:30

Maria Corina Machado News: व्हेनेझुएलातील  मुख्य विरोधी पक्षनेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मडाचो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्याने हा पुरस्कार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची निराशा झाली आहे.

'I dedicate my Nobel Prize to Donald Trump', says Maria Corina Machado | 'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   

'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   

व्हेनेझुएलातील  मुख्य विरोधी पक्षनेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मडाचो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्याने हा पुरस्कार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची निराशा झाली आहे. त्यानंतर आता नोबेल शांता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे. मचाडो यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नोबेल शांतता पुरस्कार जिंकल्यानंतर मारिया कोरिना मचाडो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे. तसेच अडचणीत असलेल्या व्हेनेझुएलाच्या जनतेसोबत उभे राहिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं.

मारिया यांनी सांगितले की, आज व्हेनेझुएलाच्या संघर्षाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्याचे आमचे उद्देश पूर्ण करण्यास मदत मिळेल.  आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. तसेच आज आमचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकन नागरिक आणि दक्षिण अमेरिकेतील जनता आणि जगभरातील लोकशाहीवादी देशांवरील विश्वास वाढला आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या स्थापनेसाठी हे सर्वजण आमचे सहकारी आहेत. मी मला आज मिळालेला पुरस्कार व्हेनेझुएलाची जनता आणि अमेरिकेचे राष्ट्रपची डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पिक करते. 

Web Title : नोबेल विजेता मचाडो ने पुरस्कार ट्रम्प को समर्पित किया, सभी हैरान

Web Summary : वेनेजुएला की विपक्षी नेता मारिया कोरिना मचाडो ने अपना नोबेल शांति पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प को समर्पित किया, जिससे सभी हैरान हैं। उन्होंने वेनेजुएला के लोगों के स्वतंत्रता और लोकतंत्र के संघर्ष में ट्रम्प के समर्थन की सराहना की। मचाडो ने अमेरिका और अन्य लोकतांत्रिक देशों के प्रति आभार व्यक्त किया।

Web Title : Nobel Winner Machado Dedicates Prize to Trump, Stuns Observers

Web Summary : Venezuelan opposition leader Maria Corina Machado dedicated her Nobel Peace Prize to Donald Trump, surprising many. She praised Trump's support for the Venezuelan people's struggle for freedom and democracy. Machado expressed gratitude to the US and other democratic nations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.