दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, मग पत्नीने दिली अशी शिक्षा ज्याचा विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:22 PM2022-08-24T15:22:06+5:302022-08-24T15:22:31+5:30

Crime News : काही दिवसांनंतर जेव्हा महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या पोलिसांनी महिलेला पतीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. 

Husband caught red handed with another woman then wife gave horrifying punishment | दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, मग पत्नीने दिली अशी शिक्षा ज्याचा विचारही केला नसेल!

दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, मग पत्नीने दिली अशी शिक्षा ज्याचा विचारही केला नसेल!

Next

Crime News : एका महिलेला तिच्या पतीने दगा दिला. त्याला वैतागून त्या महिलेने आपल्या पतीसोबत असं काही केलं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. महिलेने पतीची हत्या आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घरातच खड्डा करून पुरले. काही दिवसांनंतर जेव्हा महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या पोलिसांनी महिलेला पतीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. 

'द मिरर' च्या वृत्तानुसार, ही घटना इराणच्या तेहरान प्रांतातील आहे. इथे एका महिलेला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेवर पतीला चाकूने हल्ला करून मारण्याचा आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा आरोप आहे. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना तेहरान प्रांतातील एस्लामशहर शहरातून एका महिलेच्या 30 वर्षीय महिलेचा तुकडे केलेला मृतदेह सापडला. पोलिसांना शेजारच्या एका महिलेने फोन केला होता. तिने सांगितलं की, शेजारच्या घरातून दुर्गंधी येत आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे सापडले.
सांगण्यात आलं की, महिलेने पतीला त्याच्या प्रेयसीसोबत बघितलं होतं. ज्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. इतक्यात पती चाकू घेऊन आला. तो म्हणाला की, तुझ्या पोटात चाकू मारणार. पण काही वेळानंतर महिलेने पतीच्या पोटात चाकू मारला. 

चौकशी दरम्यान महिलेने सांगितलं की, पती मला आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीला मारहाण करत होता. तो मला दगाही देत होता. मला त्याच्या वागण्याचा वैताग येत होता. त्यामुळे मी त्याला मारलं.

महिलेने दावा केला की, तिने पतीला एका अनैतिक संबंधामुळे मारलं. त्याच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिलेचं लग्न सात वर्षाआधी झालं होतं. तेव्हा ती 15 वर्षांची होती. 

Web Title: Husband caught red handed with another woman then wife gave horrifying punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.