इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:11 IST2025-06-26T09:34:47+5:302025-06-26T10:11:13+5:30

मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही.

Huge damage to Iran's nuclear weapons! Big revelation in CIA report | इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू होता. अमेरिकेनेही हवाई हल्ला केला, या हल्ल्यात इराणच्या अणुकार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले आहे. सीआयएच्या मते, हे नुकसान भरून काढण्यासाठी इराणला अनेक वर्षे लागतील.

सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीचे प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले की, सीआयएच्या अहवालात ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह आणि अचूक गुप्त माहिती आहे. इराणने जे गमावले आहे ते पुन्हा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.

“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले

यापूर्वी, सीएनएनने पेंटागॉनच्या एका अहवालाचा हवाला देत माहिती दिली होती. या माहितीनुसार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामुळे इराणच्या अणु ठिकाणांचे फारसे नुकसान झाले नाही. या हल्ल्यामुळे इराणच्या अणू कार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले आहे.

'इराणच्या अणुकार्यक्रमाला झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन अजूनही केले जात आहे. सुरुवातीला मिळालेली माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार केलेल्या दाव्यांशी जुळत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की इराणच्या अणुसुविधा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.

अमेरिका इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही

मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणला युरेनियम समृद्ध करण्यास किंवा अण्वस्त्रे बनवण्यास परवानगी देणार नाही. काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, ज्या ओलांडू नयेत. 

अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही त्यांचे उद्दिष्ट साध्य केले आहे. आपण शस्त्रे बनवू देऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल. असे झाले तर सर्वांना बॉम्बची आवश्यकता भासेल. आणि आपण ते करू शकत नाही, असंही स्टीव्ह विटकॉफ म्हणाले.

इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर, अमेरिका आता इराणच्या संपर्कात आहे. स्टीव्ह विटकॉफ म्हणाले,

अमेरिका आणि इराणमधील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत. आतापर्यंतच्या चर्चा चांगल्या झाल्या आहेत. त्यांनी आशा व्यक्त केली की वॉशिंग्टन आणि तेहरान दीर्घकालीन शांतता करारावर पोहोचतील.

इस्रायलने १३ जून रोजी इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली. या हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले. हा संघर्ष १२ दिवस चालला. त्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली.

Web Title: Huge damage to Iran's nuclear weapons! Big revelation in CIA report