US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:22 PM2021-10-16T15:22:24+5:302021-10-16T15:23:11+5:30

US C1/D Visa: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते.

How should I prepare for my US C1 D visa interview which documents required | US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

Next

प्रश्न: एका शिपिंग जहाजावर मला नोकरीची संधी मिळाली आहे. मी C1/D मुलाखतीची तयारी कशी करू?

उत्तर: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते. भारतात असलेल्या अमेरिकेच्या कोणत्याही वकिलातीत किंवा नवी दिल्लीत असलेल्या अमेरिकेच्या दूतावासात सी१/डी व्हिसासाठी अर्ज करता येऊ शकतो.

इतर सर्व व्हिसा अर्जदारांप्रमाणेच, सी१/डी अर्जदारांनी अपॉईंटमेंटच्या १५ मिनिटं आधी दूतावासात पोहोचावं. त्यांनी येताना पासपोर्टसोबतच, स्वत:चं कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी)/सीमॅन बुक आणि शिपिंग कंपनीकडून देण्यात आलेलं नियुक्तीचं पत्र आणावं. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक सीडीसी असल्यास ती सर्व मुलाखतीवेळी घेऊन यावीत. कारण मुलाखत घेणारा अधिकारी त्याबद्दल तुमच्याकडे विचारणा करू शकतो.

शिपवरील कामाचा अनुभव, कोणत्या प्रकारच्या बोटीत नियुक्ती झाली, शिपवर करावी लागणारी कामं, कोणत्या बंदरावर काम करणार, याबद्दल सर्व क्रू सदस्य अर्जदारांकडे विचारणा केली जाऊ शकते. या सगळ्या प्रश्नांची तुम्ही प्रामाणिक आणि स्पष्ट उत्तरं देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इंग्रजीत संवाद साधताना अडचणी येत असल्यास, तुम्ही अधिकाऱ्याकडे स्थानिक भाषेत संवाद साधू शकणाऱ्या दुभाष्याची मागणी करू शकता. (दुभाष्याची मागणी तुम्ही मुलाखतीच्या आधी करायला हवी). जर तुम्हाला अधिकाऱ्याचा/दुभाष्याचा प्रश्न समजला नसल्यास, तुम्ही तो पुन्हा विचारण्यास सांगू शकता.

मुलाखतीच्या शेवटी अधिकारी तुम्हाला व्हिसा मंजूर झाला आहे की नाही ते सांगेल. व्हिसा मंजूर झाला असल्यास, अधिकारी तुमचा पासपोर्ट ठेऊन घेईल. अधिकारी कदाचित तुमचं सीडीसीदेखील ठेऊन घेऊ शकतो. सात ते दहा दिवसांत छापील व्हिसा देताना तुम्हाला तुमचा पासपोर्ट आणि सीडीसी परत करत करण्यात येईल. व्हिसा नाकारला गेल्यास, अधिकारी तुम्हाला पासपोर्ट आणि सीडीसी नकार पत्रासोबत परत करेल. तुम्हाला व्हिसा का नाकारण्यात आला याची माहिती त्या पत्रात असेल.

काही व्हिसा अर्ज इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या २२१(जी) अंतर्गत नाकारली जातात. याचा अर्थ अर्जासोबत अतिरिक्त प्रशासकीय प्रक्रियेची गरज असते. जर २२१(जी)च्या अंतर्गत तुम्हाला व्हिसा नाकारला गेला असल्यास, व्हिसा अर्ज केंद्रात तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रं जमा करावी लागू शकतात. असं झाल्यास, तुम्हाला नवी अपॉईंटमेंट घेण्याची गरज नसते आणि कागदपत्रं जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अतिरिक्त माहिती किंवा फॉलो अप मुलाखतीची आवश्यकता असल्यास, दूतावास किंवा वकिलातीकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

अधिक माहितीसाठी,  www.ustraveldocs.com/in ला भेट द्या किंवा (91-120) 484-4644, (91-22) 6201-1000, किंवा 1-703-520-2239 नंबरवर अमेरिकेतून कॉल करा.

महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

Web Title: How should I prepare for my US C1 D visa interview which documents required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.