शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत अमूलचे दूध कितीला मिळते? तेथील लोक १ गॅलन घेतात, लीटर नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:41 IST

Amul Milk in USA: अमूलने अमेरिकन बाजारपेठेत एन्ट्री केली असून तिथे दुधाचे दर भारताच्या तुलनेत दुप्पट आहेत. $७ प्रति गॅलन दर असूनही अमेरिकन लोक अमूलच्या प्रेमात का पडलेत? वाचा सविस्तर.

भारतीय डेअरी क्षेत्रातील दिग्गज ब्रँड 'अमूल'ने आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या बाजारपेठेतही आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अमेरिकेतील अमूल दुधाच्या किमती सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भारतात ज्या दराने दूध मिळते, त्यापेक्षा जवळपास दुप्पट किमतीत अमेरिकेत अमूल दुधाची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अमूलचे 'गोल्ड' दूध (६% फॅट) मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील रिटेल स्टोअर्स, जसे की 'कॉस्टको', येथे अमूल दुधाचे गॅलन पॅक्स उपलब्ध आहेत. जिथे स्थानिक अमेरिकन दूध साधारणपणे $३ ते $३.५० प्रति गॅलन दराने मिळते, तिथे अमूलच्या दुधासाठी ग्राहकांना $६.५० ते $७ (सुमारे ५४० ते ५८० रुपये) प्रति गॅलन मोजावे लागत आहेत.

किंमत जास्त असूनही मागणी का?अमूल दुधाची किंमत जास्त असूनही तिथला भारतीय समुदाय आणि स्थानिक अमेरिकन ग्राहकही याला पसंती देत आहेत. याची काही मुख्य कारणे:उच्च फॅट (६% Fat): अमेरिकेत सामान्यतः ३% फॅटचे दूध मिळते. अमूलचे ६% फॅट असलेले दूध चवीला क्रीमी असल्याने 'बरिस्ता मिल्क' म्हणूनही लोकप्रिय होत आहे.कॉफीसाठी उत्तम: दाट आणि क्रीमी असल्याने कॉफीमध्ये उत्तम फेस (Froth) तयार करण्यासाठी अमूल गोल्डला पसंती दिली जात आहे.ब्रँड व्हॅल्यू: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी अमूल हा केवळ ब्रँड नसून एक भावनिक नाते आहे.

स्थानिक भागीदारीतून उत्पादनअमूलने अमेरिकेत दूध निर्यात करण्याऐवजी तिथे स्थानिक डेअरी को-ऑपरेटिव्ह 'मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन' सोबत भागीदारी केली आहे. यामुळे अमेरिकेतच अमूलच्या 'रेसिपी'नुसार ताज्या दुधाचे उत्पादन केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amul Milk Price in USA: Gallons, Not Liters, Sold!

Web Summary : Amul milk is gaining popularity in the US, despite costing $6.50-$7 per gallon, almost double the local price. High fat content (6%), creamy taste, and brand value drive demand, especially among Indians and coffee enthusiasts. It's produced locally via partnership.
टॅग्स :Americaअमेरिकाmilkदूध