शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:42 IST

Australia Bondi Beach Shooting: धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला...

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण देश हादरला आहे. हा हल्ला केवळ गेल्य तीन दशकांतील सर्वात घातक गन अॅटॅकच नसून, सुनियोजित दहशतवादी आणि ज्यूविरोधी (अँटी-सेमिटिक) हल्ला असल्याचेही बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियातील अंतर्गत सुरक्षेवरच मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

पिता-पुत्रांनी केला हल्ला -या हल्ल्यात एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून, यात १५ निरपराध नागरिक आणि एक हल्लेखोराचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला ५० वर्षीय साजिद अकरम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नावीद अकरमने केला. यानंतर, पोलिसांनी केलेल्या कारवाईत साजिद अकरमचा जागीच मृत्यू झाला, तर नावीद अकरम गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला. याशिवाय, घटनास्थळावरून काही 'आयईडी' (IED) स्फोटक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. मात्र ती अगदी प्राथमिक स्तरावरील असल्याचे बोलले जात आहे. 

१० मिनिटे सुरू होता गोळीबार -ज्यू समुदायाच्या हनुक्का कार्यक्रमादरम्यान, हा हल्ला झाला. या कार्यक्रमासाठी अंदाजे १,००० लोक उपस्थित होते. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० मिनिटे हा गोळीबार सुरू होता. या दुर्घटनेत १० वर्षांच्या मुलापासून ते ८७ वर्षांच्या वृद्धांपर्यंत ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी अँगलने तपास -ऑस्ट्रेलियाई तपास यंत्रणांच्या मते, २०१९ मध्येच, नावीद अकरमचे 'आयसिस' (ISIS) सोबत संबंध असल्याचे उघड झाले होते, त्याची चौकशीही करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, नावीद अकरम ऑस्ट्रेलियातच जन्मलेला आहे, तर त्याचा बाप साजिद अकरम टूरिस्ट व्हिसावर पाकिस्तानमधून आला होता. आता, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि उच्च सुरक्षा यंत्रणांनी ही घटना म्हणजे, देशाच्या सुरक्षेला गंभीर इशारा अशल्याचे म्हणत, आंतरराष्ट्रीय दहशतवादी अँगलने तपास केला जात आहे. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानShootingगोळीबारterroristदहशतवादी