Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:42 IST2025-12-15T11:41:15+5:302025-12-15T11:42:19+5:30

Australia Bondi Beach Shooting: धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला...

How did the terrorists who opened fire on Sydney Beach reach Australia from Pakistan Claims about terrorist father and son | Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे

Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण देश हादरला आहे. हा हल्ला केवळ गेल्य तीन दशकांतील सर्वात घातक गन अॅटॅकच नसून, सुनियोजित दहशतवादी आणि ज्यूविरोधी (अँटी-सेमिटिक) हल्ला असल्याचेही बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियातील अंतर्गत सुरक्षेवरच मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

पिता-पुत्रांनी केला हल्ला -
या हल्ल्यात एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून, यात १५ निरपराध नागरिक आणि एक हल्लेखोराचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला ५० वर्षीय साजिद अकरम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नावीद अकरमने केला. यानंतर, पोलिसांनी केलेल्या कारवाईत साजिद अकरमचा जागीच मृत्यू झाला, तर नावीद अकरम गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला. याशिवाय, घटनास्थळावरून काही 'आयईडी' (IED) स्फोटक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. मात्र ती अगदी प्राथमिक स्तरावरील असल्याचे बोलले जात आहे. 

१० मिनिटे सुरू होता गोळीबार -
ज्यू समुदायाच्या हनुक्का कार्यक्रमादरम्यान, हा हल्ला झाला. या कार्यक्रमासाठी अंदाजे १,००० लोक उपस्थित होते. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० मिनिटे हा गोळीबार सुरू होता. या दुर्घटनेत १० वर्षांच्या मुलापासून ते ८७ वर्षांच्या वृद्धांपर्यंत ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी अँगलने तपास -
ऑस्ट्रेलियाई तपास यंत्रणांच्या मते, २०१९ मध्येच, नावीद अकरमचे 'आयसिस' (ISIS) सोबत संबंध असल्याचे उघड झाले होते, त्याची चौकशीही करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, नावीद अकरम ऑस्ट्रेलियातच जन्मलेला आहे, तर त्याचा बाप साजिद अकरम टूरिस्ट व्हिसावर पाकिस्तानमधून आला होता. आता, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि उच्च सुरक्षा यंत्रणांनी ही घटना म्हणजे, देशाच्या सुरक्षेला गंभीर इशारा अशल्याचे म्हणत, आंतरराष्ट्रीय दहशतवादी अँगलने तपास केला जात आहे. 

Web Title: How did the terrorists who opened fire on Sydney Beach reach Australia from Pakistan Claims about terrorist father and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.