बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:34 IST2026-02-02T19:33:52+5:302026-02-02T19:34:29+5:30

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने २०२५ मध्येच मजीद ब्रिगेड आणि बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे....

How dangerous is Balochistan's Majid Brigade Even the Pakistan Army is scared just by hearing its name | बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते!

बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते!

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा बंडाचा भडका उडाला आहे. बलोच लिबरेशन आर्मी'ने (BLA) पुकारलेल्या 'ऑपरेशन हेरोफ २.०'ने पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणाच उघड झाली आहे. बलोच बंडखोरांनी एकाच वेळी पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले चढवले. पोलीस आणि लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला. अनेक ठिकाणी तर पाक सैन्यावर पाठ दाखवण्याची वेळ आली. मजीद ब्रिगेड, फतेह स्क्वाड आणि STOS या तीन युनिट्सनी एकत्रीतपणे ही मोहीम पार पडली.

खरे तर, 'मजीद ब्रिगेड' ही आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रिगेडची या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्त्वाची होती. महत्वाचे म्हणजे, यामध्ये महिला फिदाईनही मोठ्या प्रमाणावर आहेत. 

हवा बलोच आणि असिफा मेंगल या महिलांनी ग्वादर आणि नुश्की येथे आयएसआय (ISI) आणि सीटीडीच्या (CTD) ठिकाणांवर हल्ले केले. वाहनांना लावलेल्या बॉम्बच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत मजीद ब्रिगेडच्या ११ फिदाईनसह एकूण १८ जण मारले गेले. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने २०२५ मध्येच मजीद ब्रिगेड आणि बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. 

पाकिस्तान आरमीलाही भरते धडकी - 
मजीद ब्रिगेडची स्थापना २०११ मध्ये झाली. ही ब्रिगेड बलोच बंडखोरांची एक विशेष तुकडी आहे. २०२० मधील कराची स्टॉक एक्सचेंज हल्ला आणि २०२४ मधील कराची विमानतळ हल्ला यांसारख्या मोठ्या कारवायांमुळे पाकिस्तानी आरमीतही या ब्रिगेडची प्रचंड दहशत आहे.

असं पडलं 'मजीद ब्रिगेड' नाव
बीएलएचा माजी नेता अस्लम अचू याने माजीद ब्रिगेडची स्थापना 2010-11 मध्ये केली. या ब्रिगेडचे नाव 'माजीद', हे मजीद लंगोव सीनिअर आणि मजीद लंगोव ज्युनिअर या दोन भावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. मजीद सीनियर १९७४ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नात मारला गेला होता, तर माजीद ज्युनिअर २०१० मध्ये लष्करी कारवाईत मारला गेला होता.
 

Web Title : बलूचिस्तान की 'मजीद ब्रिगेड': पाकिस्तान सेना के लिए एक घातक खतरा।

Web Summary : बलूचिस्तान की मजीद ब्रिगेड, आत्मघाती हमलों के लिए जानी जाती है, बीएलए के 'ऑपरेशन हेरोफ 2.0' का नेतृत्व कर रही है, जो पाकिस्तानी सुरक्षा बलों को निशाना बना रही है। इसमें महिलाएं प्रमुखता से शामिल हैं, जो आईएसआई और सीटीडी के ठिकानों पर हमले कर रही हैं। ब्रिगेड के पिछले हमलों ने पाकिस्तान सेना में डर पैदा कर दिया है।

Web Title : Balochistan's 'Majid Brigade': A deadly force haunting Pakistan's army.

Web Summary : Balochistan's Majid Brigade, known for suicide attacks, spearheads BLA's 'Operation Herof 2.0', targeting Pakistani security forces. Women are prominently involved, conducting attacks on ISI and CTD locations. The brigade's past attacks instill fear in Pakistan's army.