शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:15 IST

Hindu Temple Vandalised In Canada: विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्यामंदिरात तोडफोड केल्याची घटना घडली असून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यावेळी ओंटारियोतील विंडसरमध्ये असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

विंडसर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘5 एप्रिल, 2023 रोजी या संबंधित तोडफोडीच्या रिपोर्टनंतर, अधिकाऱ्यांना नॉर्थवे एव्हेन्यूच्या 1700 ब्लॉकमधील हिंदू मंदिरात पाठवण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांना मंदिराच्या बाहेरील भिंदीवर काळ्या रंगात हिंदू आणि भारत-विरोधी भित्तिचित्रे आढळून आली.’

तपासात मिळाला व्हिडिओ -तपासात पोलिस अधिकाऱ्यांना एक व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन संशयित रात्री 12 वाजल्यानंतर (स्थानिक वेळेनुसार) दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा पाळत ठेवत आहे.'

यापूर्वीही हिंदू मंदिरांना करण्यात आले आहे लक्ष - कॅनडामध्ये हिंदू मंदिराची तोडफोड होण्याची आणि त्याच्या भिंतींवर भारतविरोधी अथवा हिंदू विरोधी घोषणा लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात कॅनडातील मिसिसॉगा येथील राम मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. तसेच भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने घडलेल्या घटनेचा निषेध केला असून कॅनडाच्या अधिकाऱ्यांना संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यातही ब्रँम्पटनमध्ये एका हिंदू मंदिरावर भारत विरोधी भित्तिचित्रे लावण्यात आली होती. यामुळे येथील भारतीय समाजात नाराजी निर्माण झाली होती. यावेळी ब्रँम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही मंदिरातील तोडफोडीचा निषेध केला होता.

टॅग्स :CanadaकॅनडाTempleमंदिरHinduहिंदूIndiaभारतPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी