बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:34 IST2025-06-29T12:34:13+5:302025-06-29T12:34:28+5:30

Bangladesh Crime News: गतवर्षी झालेल्या सत्तापरिवर्तनापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता बांगलादेशमध्ये एका २१ वर्षीय हिंदू तरुणीवर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Hindu girl raped in Bangladesh, video made, BNP leader accused | बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

गतवर्षी झालेल्या सत्तापरिवर्तनापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता बांगलादेशमध्ये एका २१ वर्षीय हिंदू तरुणीवर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशमधील कुमिल्ला जिल्ह्यातील मुरादनगर येथे पीडित तरुणी तिच्या वडिलांना भेटण्यासाठी हरिसेवा नावाच्या स्थानिक धार्मिक कार्यक्रमात आळी होती, तेव्हा ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने या तरुणीवर बलात्कार करून त्याचं चित्रिकरणही केलं. एवढंच नाही तर पोलिसांकडे तक्रार केल्यास जिवे मारेन अशी धमकी दिली.  

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा स्थानिक नेता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीने बलात्कार पीडितेचा व्हिडीओसुद्धा चित्रित केल्याचे समोर आले आहे. पीडितेचा व्हिडीओ चित्रित करून तो व्हायरल केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आले आहे.या घटनेनंतर मुरादनगर, कुमिल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.  

Web Title: Hindu girl raped in Bangladesh, video made, BNP leader accused