शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

कॅनडात उष्णतेची लाट; १३० जणांचा मृत्यू, तापमान ४९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 9:36 AM

काही ठिकाणी तापमान ४९ अंशांवर

ठळक मुद्देकॅनडामध्ये सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी तापमानात वाढ  झाली आहे. लिटन या गावामध्ये मंगळवारी ४९.६ सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

ओटावा : कॅनडामध्ये अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या शुक्रवारपासून तिथे १३० जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती वयस्कर आहेत. त्यातील काही जण विविध व्याधींनी जर्जर होते. उष्णतेची लाट येण्यामागे ग्लोबल वॉर्मिंगसोबतच इतरही कारणे आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

कॅनडामध्ये सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी तापमानात वाढ  झाली आहे. लिटन या गावामध्ये मंगळवारी ४९.६ सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. कॅनडाचा पश्चिम भाग तसेच अमेरिकेच्या काही भागात उष्णतेची लाट आली आहे. रविवारच्या आधी कॅनडामध्ये ४५ सेल्सिअसच्या पुढे कधीही तापमान गेले नव्हते. व्हँकुव्हर  शहरामध्येच शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेमुळे ६५हून अधिक जण मरण पावले आहेत. कॅनडातील लिटन या गावातील रहिवासी मेगन फँडरिच यांनी सांगितले की, हवेत इतका उष्मा वाढला आहे की, त्यामुळे घराबाहेर जाऊन कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागामध्ये याआधी उष्ण तापमान फारसे वाढत नसे. त्यामुळे अनेक घरांमध्ये एसी बसविलेले नाहीत; पण गेल्या शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेत तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यानंतर या रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत. 

वणवे लागण्याचाही मोठा धोकाnकॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, अल्बेर्टा, सॅस्काचेवान, मॅनिटोबा या भागांमध्ये उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे, असे तेथील पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे. nउष्णतेच्या लाटेमुळे या भागांतील जंगलात वणवेही लागू शकतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता तेथील अग्निशमन दल सतर्क झाले आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाSummer Specialसमर स्पेशलDeathमृत्यू