त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 03:38 PM2019-03-07T15:38:01+5:302019-03-07T15:38:57+5:30

बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचा सोंग घेऊन माझा विश्वासघात केला असल्याचं डोरथीनं म्हटलं आहे.

He play role of deaf-and-dumb long 62-years, husband want keep to wife | त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं 

त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं 

Next

मुंबई - नवरा-बायकोचं भांडण ही काही नवीन गोष्ट नसते. संसार करायचा म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच की, असे आपण नेहमीच थोरा-मोठ्यांकडून ऐकत असतो. तसेच अनेकदा याबाबतचे अनुभवही आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र, बायकोच्या भांडणाचा किंवा बोलण्याचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून अमेरिकेतील एका पतीने चक्क 62 वर्षे मुकबधीर असल्याचं सोंग केलं. पण, अखेर त्याच बिंग फुटलंच. 

अमेरिकेतील एका शहरात राहणाऱ्या या जोडप्याच नाव बेरी आणि डोरथी असं आहे. 84 वर्षीय पती बेरी यांनी 80 वर्षीय पत्नी डोरथीला चक्क 62 वर्षे उल्लू बनवल होतं. मात्र, पतीचं खोटं उघडं पडल्यानंतर पत्नी डोरथी यांनी पती बोरी यांना घटस्फोट देण्याच नक्की केलं आहे. बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचा सोंग घेऊन माझा विश्वासघात केला असल्याचं डोरथीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आपला नवरा मुकबधीर असल्यामुळे तिने 2 वर्ष मेहनत घेऊन सांकेतिक भाषाही शिकली होती. आमच्या मुलांना आणि नातवांनाही ते मुकबधीर असल्याचं खरंच वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या या सवयीची सर्वांना सुरुवातील त्रास झाला. परंतु, सर्वांनीच त्यांच्या या सवयीची सवय करुन घेतली होती. मात्र, यांनी 62 वर्षे खोटं बोलून आम्हाला फसवल्याचे अतिशय वाईट वाटत असल्याचे पत्नी डोरथीने म्हटलं आहे. 

दरम्यान, बेरी यांच्या पत्नी डोरथी या खूपच बडबड्या आहेत. त्यामुळे जर बेरींनी मुकबधीर असल्याचं ढोंग केलं नसतं, तर या दोघांचा संसार 60 वर्षांपूर्वीच मोडला असता, असे सांगत बेरीच्या वकिलांनी बेरीचं समर्थन केलं आहे. पण, डोरथी यांचा निर्णय पक्का असून त्यांनी बेरीकडून झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या पती-पत्नीच्या भांडणाची अजबच कथा चर्चेचा विषय बनली आहे.
ठी 'गोड' बातमी

Web Title: He play role of deaf-and-dumb long 62-years, husband want keep to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.