सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:04 IST2025-06-04T16:03:21+5:302025-06-04T16:04:26+5:30

मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी डिंगने पत्नीला घटस्फोट दिला आणि मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

He married a young woman claiming to be a surgeon, and as soon as the marriage began, he was cheated out of 3.5 crores! | सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

चीनच्या हेबेई प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ वर्षीय ली शांग्झुआन या महिलेची तिच्या पतीनेच कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा विश्वासघाताचा हृदयद्रावक प्रकार समोर आल्यानंतर, ली आता न्यायासाठी संघर्ष करत आहे.

२०१३ मध्ये एका कार अपघातात लीला कंबरेखाली अर्धांगवायू झाला. उपचारादरम्यान तिची भेट डिंग नावाच्या व्यक्तीशी झाली. डिंगने स्वतःची ओळख एक सर्जन म्हणून करून दिली होती. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न केले. मात्र, हा सुखी संसार फार काळ टिकला नाही.

पतीचे खोटे दावे आणि फसवणूक
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत डिंगला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने लीला व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली ३० लाख युआन (सुमारे ३.५ कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी दबाव आणला. यासाठी त्याने लीला मारहाणही सुरू केली.

पीडित लीने सांगितले की, त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी डिंगने तिला घटस्फोट दिला आणि मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. डिंगचा सर्जन असल्याचा दावा खोटा होता. त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे हॉस्पिटलच्या इंटर्नशिपमधून काढून टाकण्यात आले होते आणि त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा परवाना नव्हता. त्याने ज्या व्यवसायाबद्दल सांगितले होते, तो देखील खोटा होता; लग्नाच्या वेळी तो आधीच कर्जात बुडालेला होता.

लीचा संघर्ष आणि न्यायासाठी लढा
आज ली तिच्या मुलाला एकटीच वाढवत आहे, ज्याने कधीही त्याच्या वडिलांना पाहिले नाही. गेल्या महिन्यात लीने तिची हृदयद्रावक कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. आयुष्याचा दीर्घकाळ व्हीलचेअरवर घालवलेली ली आता उभी राहू शकते. लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन वस्तू विकून ती तिच्या मुलाचा सांभाळ करत आहे. लीने डिंगविरुद्ध फसवणूक आणि घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे, ज्याची सुनावणी जूनमध्ये होणार आहे.

Web Title: He married a young woman claiming to be a surgeon, and as soon as the marriage began, he was cheated out of 3.5 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.