VIDEO: जंगलाची आग शहरात पसरली; अख्ख शहर जळून खाक, 53 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 19:13 IST2023-08-11T19:12:23+5:302023-08-11T19:13:16+5:30

भयानक आगीमुळे परिसर नरकाप्रमाणे दिसत होता. VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप...

hawaii-fire-2023-looks-like-hell-social-media-wildfire-update-watch-videos | VIDEO: जंगलाची आग शहरात पसरली; अख्ख शहर जळून खाक, 53 जणांचा मृत्यू

VIDEO: जंगलाची आग शहरात पसरली; अख्ख शहर जळून खाक, 53 जणांचा मृत्यू

Fire in Hawaii: सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या परिसराला आग लागल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. ही आगीची घटना हवाईच्या माउ काउंटीमधील लाहैनाची आहे. या बेटांवर अनेक लोकांचे वास्तव्य आहे. या परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली, नंतर ही आग शहरात पसरली. 

या धक्कादायक घटनेत 53 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकज गंभीररित्या भाजले गेले. आगीमुळे 1700 हून अधिक इमारतीही उद्ध्वस्त झाल्या, अनेक गाड्याही जळून खाक झाल्या. काही ऐतिहासिक वास्तूही खाक झाल्या आहेत. आगीमुळे या परिसरात राहणाऱ्या हजारो लोकांना जीव वाचवून पळावे लागले. दक्षिणेकडून वाहणाऱ्या डोरा वादळामुळे जंगलातील आग वाढली. 

रात्रभर आगीचे लोट वाढत होते, त्यामुळे अनेकजण आपल्या मुलाबाळांसह समुद्राच्या दिशेने धावले. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी समुद्राताही उड्या मारल्या. आगीमुळे धूर इतका पसरला की, अग्निशमन दलाच्या जवानांना त्याचा त्रास सुरू झाला. त्यांनाही नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. अध्यक्ष जो बायडेन यांनी शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

हे व्हिडिओ पाहून तुम्ही तेथील परिस्थितीचा अंदाज लावू शकता. या भीषण घटनेनंतर तिथे मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे.

 

Web Title: hawaii-fire-2023-looks-like-hell-social-media-wildfire-update-watch-videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.