शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 05:26 IST

हमासने केलेल्या  हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे.

वॉशिंग्टन: सौदी अरेबिया व इस्रायलमध्ये शांतता करार होण्याची शक्यता वाटल्यामुळेच हमासने इस्रायलवर भीषण हल्ला केला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. त्याबाबतची संभाव्य चर्चा उधळून लावण्यासाठी हमासने सारे कारस्थान रचले, असा आरोपही त्यांनी केला.

पॅलेस्टाइनमधील नागरिकांना आणखी अधिकार मिळावेत तसेच त्यांची सुरक्षितता धोक्यात येता कामा नये, अशा अटी सौदी अरेबियाने इस्रायलला घातल्या होत्या. त्या पाळण्यास होकार दर्शविल्यास इस्रालयबरोबर शांतता करार करण्याची सौदी अरेबियाने तयारी दर्शविली होती, मात्र हमासने केलेल्या  हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे.

हमासकडे २०० लोक ओलीस 

हमासने २०० लोकांना ओलीस ठेवले असून, त्यातील या दोघींची सर्वप्रथम मुक्तता करण्यात आली. हमासच्या तावडीत सापडलेल्या सर्व अमेरिकी नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले. ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली यांना इस्रायलमार्गे लवकरच अमेरिकेला पाठविण्यात येणार आहे. आणखी दहा अमेरिकी नागरिक हमासच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकी महिलांची मुक्तता

हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली रनन या दोन अमेरिकी महिलांची सुटका केली. या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ले केले होते. तेव्हा या दोघी हमासच्या तावडीत सापडल्या होत्या. त्यांची सुटका झाल्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोघींशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तुम्ही संकटाला धाडसाने तोंड दिल्याबद्दल बायडेन यांनी त्यांचे कौतुक केले.

अनेक देशांत इस्रायलविरोधात निदर्शने

- गाझा येथे इस्रायलने केलेल्या भीषण बॉम्बहल्ल्यांचा निषेध करण्यासाठी ब्रिटनमध्ये लंडन व अन्य शहरांत पॅलेस्टाइनच्या समर्थकांनी शनिवारी मोर्चे काढले. 

- लंडनमधील हाइड पार्क येथे हे मोर्चेकरी जमा झाले होते. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे इस्रालयविरोधात शनिवारी मोर्चा काढला. 

- त्याशिवाय इजिप्त, लेबनॉन, तुर्कस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, आदी देशांमध्येही पॅलेस्टिनी समर्थकांनी उग्र निदर्शने केली. 

- गाझावर इस्रायलने सुरू केलेले हल्ले त्वरित थांबविण्यात यावेत, अशी मागणी या निदर्शकांनी केली आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन