शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

‘हायपरथ्रिचोसिस’मुळे चेहऱ्यावर उगवले केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2015 00:23 IST

‘हायपरथ्रिचोसिस’ या अत्यंत दुर्मिळ रोगामुळे एका इसमाच्या चेहऱ्यावर केस उगवले आहेत. या केसामुळे लज्जित झालेल्या जिजस अ‍ॅसेव्हस् या इसमाने प्रारंभी काही वर्षे स्वत:चा

मेक्सिको सिटी : ‘हायपरथ्रिचोसिस’ या अत्यंत दुर्मिळ रोगामुळे एका इसमाच्या चेहऱ्यावर केस उगवले आहेत. या केसामुळे लज्जित झालेल्या जिजस अ‍ॅसेव्हस् या इसमाने प्रारंभी काही वर्षे स्वत:चा चेहरा हाताने झाकून जीवन जगण्याचा प्रयत्न केला; पण परिस्थिती अटळ असल्याचे पाहून आता त्याने उजळ माथ्याने जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.‘हायपरथ्रिचोसिस’ या अतिशय दुर्मिळ विकारामुळे ४१ वर्षीय जिजसच्या चेहऱ्यावर बारीक केस उगवले आहेत. चेहऱ्यावर केस उगवण्याचा हा अपवादात्मक विकार असून, त्याला ‘वेअरवूल्फ सिंड्रोम’ असे संबोधले जाते. या विकारामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर लांडग्याप्रमाणे केस उगवतात. आतापर्यंत असा विकार झालेले संपूर्ण जगात केवळ ५० जण असून, त्यातील १३ जण मेक्सिकोतील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. मेक्सिकोतील झॅकटेक्सास या मध्यवर्ती प्रांतात लोरेटो या शहरात ते राहतात. या १३ जणांत सात पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. या १३ जणांतच जिजस अ‍ॅसेव्हस् याचा समावेश आहे. त्याला ‘चुही’ या टोपणनावानेही ओळखले जाते. चेहऱ्यावरील केसांमुळे समाजात जीवन जगताना त्याला अतिशय कठीण संघर्ष करावा लागला. त्याच्या चेहऱ्यावर बालपणापासून केस असल्याने ‘देवाने आम्हाला इतरांपेक्षा वेगळे का बनवले? मी वेगळा का आहे?’ असा सवाल तो करतो. ‘हायपरथ्रिचोसिस’ हा विकार वांशिक असून, चेहऱ्यावर केस उगवण्याखेरीज त्याचे अन्य कोणतेही परिणाम दिसत नाहीत; पण त्यामुळे रोजगार मिळविण्यात खूप अडचणी येतात. ‘मी इतरांपेक्षा वेगळा असल्याने संधी मिळत नाही; पण मला का संधी नाकारली जाते हे मला अजून समजले नाही, असे अ‍ॅसेव्हस् म्हणतो.त्याने संपूर्ण जीवनपट उलगडून सांगताना कठीण बालपण आणि सर्कसमधील विपरित अनुभव त्याने कथन केले. टीव्हीवरील शोच्या वेळी त्याने दोनदा चेहऱ्यावरील केस कापून टाकले होते. एक शो जपानी आणि दुसरा ब्रिटिश टीव्हीवर झाला होता. चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याचा अनुभवही फारसा चांगला नाही, मलाच माझा चेहरा विचित्र, निळसर रंगाचा दिसत होता, असे तो म्हणाला. त्यामुळे पुन्हा कधी चेहऱ्यावरील केस काढण्याचा विचार मी केला नाही; उलट ठामपणाने जगण्याचा निर्धार केला. (वृत्तसंस्था)हेटाळणीमुळे बनला मद्यपी!वर्गातही अन्य मुले त्याची थट्टा करीत असल्याने त्याने शाळा सोडून दिली. ही मुले त्याची हेटाळणी करून चेहऱ्यावरील केस ओढत असत. त्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षापासून त्याला मद्याची सवय लागली. त्यानंतर तो मद्यपीच बनला. त्याच्या अन्य दोन भावांचीही हीच अवस्था होती. सर्कसमध्ये काम करताना त्याला दिवसाला ८ डॉलर्स मिळत असत.