शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 22:30 IST

मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला हाफीजच्या नजरकैदेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हाफीजची नजरकैद 30 दिवसांनी वाढवली आहे.

इस्लामाबाद- मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला हाफीजच्या नजरकैदेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हाफीजची नजरकैद 30 दिवसांनी वाढवली आहे.परंतु हाफीजचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी काशिफ हुसेन यांना नजरकैदेत ठेवण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईदसह त्याचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद व काझी काशिफ हुसेन यांना आज लाहोर उच्च न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. तेव्हा पंजाबमधील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी हाफीज व इतर चौघांची नजरकैद तीन महिन्यांसाठी वाढववण्याची मागणी केली होती.

परंतु हाफीज सोडून इतरांची नजरकैद वाढवण्यास लाहोर उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे आता हाफीज सईदची नजरकैद 24 ऑक्टोबरनंतर आणखी 30 दिवस वाढवली जाणार आहे. सईदची नजरकैद 30 दिवसांसाठी वाढवताना अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. हाफीज सईदला दहशतवादविरोधी कलम 1997 अन्वये 31 जानेवारी रोजी 90 दिवसांची नजरकैद देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले होते. दरम्यान, हाफिझ सईदची दहशतवादी संघटना असलेल्या जमात उल दावाने हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेतल्याने बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत आहोत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान