hackers played jai shri ram during pakistans international webinar on kashmir | पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन मीटिंग हॅक; 'जय श्रीराम'च्या घोषणा

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन मीटिंग हॅक; 'जय श्रीराम'च्या घोषणा

नवी दिल्ली: पाकिस्तानचीजम्मू-काश्मीर प्रश्नावरील एक ऑनलाईन मीटिंग हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानकडून आयोजित करण्यात आलेलं वेबिनार सुरू होताच हॅकर्सनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मीटिंगमध्ये सहभागी झालेल्यांना धक्काच बसला. अचानक घोषणा कुठून सुरू झाल्या याचा शोध घेण्यास सुरुवात करताच वेबिनारच हॅक झाल्याचं त्यांना समजलं.

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेबिनारला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसह अन्य देशांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. मीटिंग सुरू असताना अचानक 'जय श्रीराम'च्या घोषणा असलेली गाणी सुरू झाली. वेबिनारचं आयोजन करणाऱ्या डॉ. वलीद मलिक यांनीच ही गाणी सुरू केली असावीत, असं सहभागी झालेल्या पाहुण्यांना सुरुवातीला वाटलं.

"पाक लष्करप्रमुखांचे पाय थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"

जय श्रीरामाच्या घोषणा असलेली गाणी वेबिनारमध्ये बराच वेळ सुरू होती. दरम्यान सहभागी पाहुणे वलीद मलिक यांना गाणी बंद करण्यास सांगत होते. मात्र गाणी सुरूच होती. 'जय श्रीराम' घोषणा सुरू असतानाच 'आम्ही भारतीय आहोत', 'रडत राहा', असे आवाजही ऐकू आले. त्यानंतर डॉ. वलीद यांनी मी हे सगळं रेकॉर्ड करत असल्याचं म्हटलं. मीटिंग संपल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही मीटिंग झूमवर सुरू होती. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या एका विद्यापीठाची वेबसाईटदेखील हॅक झाली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hackers played jai shri ram during pakistans international webinar on kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.