लग्नात मित्रांची मस्ती पडली महागात, थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नवरदेव; वाचा काय झालं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:57 IST2021-09-23T17:48:35+5:302021-09-23T17:57:30+5:30
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम रोमानियाच्या बिहोर काउंटीमध्ये घटली आहे. जेव्हा नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकलं.

लग्नात मित्रांची मस्ती पडली महागात, थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नवरदेव; वाचा काय झालं....
लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाचे मित्र-मैत्रिणी नेहमी मस्ती करतात. या मजा-मस्तीमुळे लग्नात एक वेगळीच रंगत येते. पण रोमानियातील एका तरूणाला मित्रांची ही मजा-मस्ती चांगलीच महागात पडली आहे. लग्नाच्या स्टेजवर नवरदेव थेट हॉस्पिटलमधील बेडवर पोहोचला आहे. नवरदेवाचा पाठीचा कणा मोडला आहे आणि सध्या त्याला काही दिवस हॉस्पिटलमद्येच रहावं लागणार आहे.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम रोमानियाच्या बिहोर काउंटीमध्ये घटली आहे. जेव्हा नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकलं, तेव्हा ते त्याला पकडण्यात अपयशी ठरले. झालं असं की, नवरी-नवरदेव स्टेजवरच होते. तेव्हा नवरदेवाचे काही मित्र तिथे आले. त्यांनी नवरदेवाला हवेत फेकलं. पहिल्यांदा तर त्यांनी नवरदेवाला बरोबर कॅच केलं. पण दुसऱ्यांदा ते यात अपयशी ठरले. (हे पण वाचा : बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...)
३१ वर्षीय नवरदेव हवेतून थेट जमिनीवर डोक्यावर आपटला. त्यानंतर आनंदाच्या वातावरणात दुख:चं सावट पसरलं. मित्र लगेच नवरदेवाला हॉस्पिटलमद्ये घेऊन गेले. इथे डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचा पाठीचा कणा मोडला. त्याला काही दिवस हॉस्पिटलमद्येच रहावं लागेल. पीडित म्हणाला की, 'लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. सगळेच आनंदी होते आणि तेव्हाच माझे मित्र आले. त्यांना मला हवेत फेकलं. ही त्यांची आनंद व्यक्त करण्याची पद्धत होती. पण तेव्हाच दुर्घटना घडली'.
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नवरदेव हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही रिसेप्शन सुरूच होतं. नवरीसोबतच दोन्ही परिवाराचे सदस्य पूर्णवेळ रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. तेच पीडित नवरदेव आता आपल्या मित्रांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. तो म्हणाला की, 'मी माझ्या वकिलाला संपर्क केला आहे. पण कळत नाहीये की, काय करावं'.