Grenade explodes in Ukraine's capital; Two killed | युक्रेनच्या राजधानीत ग्रेनेड फुटला; दोन ठार
युक्रेनच्या राजधानीत ग्रेनेड फुटला; दोन ठार

कीव : युक्रेनमध्ये ग्रेनेड फुटल्याने मोठी घटना घटली आहे. मंगळवारी रात्री कीव शहरामध्ये या घटनेत दोन जण ठार झाले असून एक महिला जखमी झाली आहे. 


हे ग्रेनेड तेव्हा फुटले जेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी चुकीने एका कॅफेच्या बाजुला पडलेले ग्रेनेड उचलले. याचवेळी हे ग्रेनेड फुटले. घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी ही माहिती तेथील स्थानिक वृत्त वाहिनीला दिली. या घटनेत दोघांचा मृत्यू आणि एक महिला जखमी झाली आहे. य़ा महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 


घटनास्थळाला पोलिसांनी वेढा घातला असून तपास सुरू आहे. 


Web Title: Grenade explodes in Ukraine's capital; Two killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.