Greece wildfires: ग्रीसमध्ये अग्नितांडव! जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली; वन्यप्राणी, लोक झाले बेघर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:33 IST2021-08-08T14:32:43+5:302021-08-08T14:33:32+5:30
Greece wildfires: हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. या आगीच्या रौद्ररुपामुळे आजुबाजुच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी अॅथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत.

Greece wildfires: ग्रीसमध्ये अग्नितांडव! जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली; वन्यप्राणी, लोक झाले बेघर
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलातआगीने हाहाकार उडविलेला होता. यंदा युरोपीय देश ग्रीसमधील जंगलांमध्ये भीषण (wildfires) वणवा पेटला आहे. ही आग गेल्या पाच दिवसांपासून नियंत्रणाबाहेर जात असून समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरू लागल्याने हाहाकार उडाला आहे. या आगीत अनेक घरे भस्मसात झाली आहेत. (Homes, businesses and farms burned during Greece’s most protracted heatwave in 30 years.)
हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. या आगीच्या रौद्ररुपामुळे आजुबाजुच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी अॅथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. ग्रीसच्या तीन मोठ्या जंगलांमध्ये हा आग लागली आहे. तीन दशकांतील वाढलेल्या उष्णतेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. तेथील तापमान हे 45 डिग्री सेल्सिअसवर गेले आहे.
शुक्रवारी एका स्वयंसेवर अग्निशामक व्यक्तीचा आगीत मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून 20 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. दुसरीकडे देशातील सर्वात मोठे बेट एविया, अॅथेंसच्या पूर्वेकडे मंगळवारी भीषण आग लागली होती. या आगीत हजारो एकर प्राचीन वन संपदा जळून नष्ट झाली आहे.
अग्निशामक दलाला खतरनाक आणि अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जवळपास 154 छोट्या मोठ्या जंगलांची आग त्यांना एकाचवेळी विझविण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. तर 64 जंगल क्षेत्र रात्रीच्यावेळी देखील जळत आहेत. यामुळे आसपासच्या गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये लाखो घरे आणि उद्योगधंदे नष्ट झाले आहेत.