शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

अमेरिकेत सरकारचे कामकाज बंद; खर्चास संमती नसल्याने शटडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:34 AM

अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी मध्यरात्रीपासून अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी मध्यरात्रीपासून अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.खर्चाच्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडण्याची तसेच कित्येक सरकारी लाखो कर्मचाºयांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अ‍ॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासल्यास वा निधीला मंजुरी न मिळाल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावेच लागते.निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकार स्टॉप गॅप बिल (तात्पुरती व्यवस्था करणे) आणते. अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाबरोबरच सिनेट सदस्यांचीही त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते. ते बिल प्रतिनिधी मंडळाने मान्य केले. पण सिनेटमध्ये त्यावर चर्चा सुरू असताना, रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे विधेयकास मंजुरी न मिळाल्याने अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली.डेमॉक्रेट्सवर खापरआर्थिक संकट टाळण्यासाठी हे बिल पास होणे आवश्यक होते. मात्र तसे होऊ शकले नाही. त्याचे सारे खापर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रेट्सवर फोडले आहे. त्यांच्यामुळे देशावर आर्थिक संकट आले, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)सहाव्यांदा उद्भवली ही स्थितीबराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३ मध्येही असे घडले होते. तेव्हा सरकारी कामकाज दोन आठवडे पूर्णपणे बंद झाले होते आणि ८ लाख लोकांना घरी बसण्याची वेळ आली होती. त्याआधीही पाच वेळा अमेरिकेत असे शटडाउन झाले होते. नागरी व राष्ट्रीय सुरक्षा यांवर शटडाउनचा परिणाम होत नाही. त्यातील कर्मचारी काम करत राहतील, पण निधीची व्यवस्था होईस्तोवर त्यांना वेतन दिले जाणार नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका