जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:47 IST2025-01-14T14:46:35+5:302025-01-14T14:47:18+5:30
Gold Mine Accident: या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला असून, 500 जणांचा जीव धोक्यात आहे.

जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video
South Africa Gold Mine: दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या कामगारांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीत अडकलेल्या 100 हून अधिक मजुरांचा मृत्यू झाला, असून 500 हून अधिक खाण कामगार अजूनही आत अडकले आहेत. या मजुरांचा अन्न-पाण्याविना मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, खाणीत उपासमारीने कामगार मरतच होते, पण आणि बाहेर कोणालाच त्याची माहिती नव्हती.
खाणीतून कामगारांनी व्हिडीओ पाठवला
खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाचे प्रवक्ते साबेलो म्गुनी म्हणाले की, हे कामगार अनेक महिन्यांपासून उत्तर पश्चिम प्रांतातील खाणीत अडकले आहेत. उपासमारीमुळे किमान 100 खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित खाण कामगारांनी या मृत कामगारांचा व्हिडिो पाठवल्यामुळे घटना उघडकीस आली. सध्या मृतदेह बाहेर काढले जात आहेत. याशिवाय अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 26 जिवंत लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
🇿🇦🚨 #BREAKING: At least 100 illegal miners have died in an abandoned gold mine in South Africa after being trapped underground for months!
— TabZ (@TabZLIVE) January 13, 2025
According to Sabelo Mnguni, a spokesperson for the Mining Affected Communities United in Action Group, the miners, who were stuck in a… pic.twitter.com/iOCT8Lleh4
धोक्याची खाण
पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारपासून नव्याने बचाव कार्य सुरू केले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत अवैध खाणकाम सामान्य बाब आहे. कंपन्यांनी बंद केलेल्या खाणींमध्ये बेकायदेशीरपणे घुसून सोन्याचा साठा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच एका खाणीत हा दुर्दैवी अपघात झाला आहे.