बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:38 IST2022-05-09T18:36:46+5:302022-05-09T18:38:26+5:30
एक मुलगी तिच्या घरातील फ्लोरवर मृत आढळून आली आणि त्यावेळी तिच्या हातात डिओड्रंट होतं. असं मानलं जात आहे की, डिओड्रंटचा वास घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

बेडरूममध्ये आढळला १६ वर्षीय मुलीचा मृतदेह, डिओड्रंट बनला मृत्यूचं कारण?
Girl found dead after sniffed aerosol: प्रत्येक घरात सामान्यपणे डिओड्रंटचा वापर केला जातो जेणेकरून घामामुळे येणारी दुर्गंधी दूर करता यावी. पण तुम्ही कधी याचा विचार केला नसेल की, डिओड्रंट कुणाच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. एक मुलगी तिच्या घरातील फ्लोरवर मृत आढळून आली आणि त्यावेळी तिच्या हातात डिओड्रंट होतं. असं मानलं जात आहे की, डिओड्रंटचा वास घेतल्याने तिचा मृत्यू झाला.
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्सची आहे. ब्रोकन हिल्समध्ये राहणारी १६ वर्षीय मुलगी ब्रूक रयानचा मृतदेह घरातील फ्लोरवर आढळून आला होता. तिच्या हातात डिओड्रंटची कॅन होती आणि असं मानलं जात आहे की, तिने एरोसोलचा वास घेतला होता.
फ्लोवर मृतदेहाजवळ एक टॉवेलही आढळून आला. मुलगी एक प्रतिभावंत एथलीट होती आणि क्रोमिंग नावाची जीवघेणी अॅक्टिविटी केल्यावर तिने एरोसोलचा वास घेतल्यावर संशयास्पदरित्या मृत्यू झाला. असं मानलं जात आहे की, तिला हृदयविकाराचा झटका आला.
ऑस्ट्रेलियातील एका स्कूल टीचरने आधीच अशी घटना रोखण्याच्या उद्देशाने डिओड्रंटच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मृत मुलीची आई ऐनी रयानने इतर नातेवाईकांना याच्या धोक्याबाबत इशारा देण्यासाठी मदर्स डे निमित्ताने आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती दिली आणि सांगितलं की, फेब्रुवारी महिन्यात तिच्या मुलीसोबत ही घटना घडली.
रयानने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितलं की, 'मी जागते, मी तिच्याबाबत विचार करते, मी झोपते आणि तिच्याबाबत विचार करते. दररोज एक वाईट स्वप्न येतं. ती गोल्डन हार्ट असलेली एक सुंदर मुलगी होती. तिची खूप आठवण काढली जाते. तिच्या मृत्यूमुळे कितीतरी लोकांवर निगेटिव्ह इफेक्ट पडला आहे.
मृत मुलीच्या आईने सांगितलं की, तिच्या मुलीचा मृत्यू अचानक हुंगण्याच्या आजाराने झाला. तरी अजून कोरोनरचा एक रिपोर्ट जारी होणं बाकी आहे. ऐनी म्हणाली की, ब्रूक चिंतेत होती. खासकरून महामारी दरम्यान. ती तिच्यासमोर येणाऱ्या अडचणींना पार करण्यासाठी मजबूत होती.
मुलीला मोठी झाल्यावर वकील, फिजिओथेरपिस्ट किंवा ब्युटिशिअन बनायचं होतं. पण अचानक झालेल्या घटनेने तिचा जीव गेला. इनहेलेंटबाबत इशारा देत रयानने सांगितलं की, लोकांना इनहेलेंटच्या धोक्याबाबत शिकवणं गरजेचं आहे आणि डिओड्रंटच्या कॅनवर लेबेल लावून एरोसोल घेण्याच्या धोक्याबाबत स्पष्ट शब्दात लिहिलेलं असावं.