‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 00:20 IST2025-12-27T00:20:04+5:302025-12-27T00:20:32+5:30
United State News: अमेरिकेतील एका पत्रकाराने अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना एक इशारा दिला आहे. २०२६ मध्ये भारतीय वंशाचे लोक आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य करून हल्ले होऊ शकतात, असा इशारा अमेरिकन पत्रकार मॅट फॉर्नी याने दिला आहे.

‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारताचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सरकारकडून भारत आणि अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या भारतीयांबाबत कठोर धोरण अवलंबण्यात येत आहे. दरम्यान आता अमेरिकेतील एका पत्रकाराने अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना एक इशारा दिला आहे. २०२६ मध्ये भारतीय वंशाचे लोक आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य करून हल्ले होऊ शकतात, असा इशारा अमेरिकन पत्रकार मॅट फॉर्नी याने दिला आहे.
फॉर्नी याने सांगितले की, येथे राहत असलेल्या भारतीय वंशाच्या सर्व लोकांना अमेकिकेतून निर्वासित केले पाहिजे. त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, अमेरिकेमध्ये भारतीयांप्रति असलेला द्वेष २०२६ मध्ये शिगेला पोहोचेल. तसेच भारतीय वंशाचे लोक, त्यांची घरे, व्यवसाय आणि मंदिरे मोठ्या प्रमाणावर हिंसेची शिकार होतील. मात्र वाद वाढू लागल्यानंतर फॉर्नी याने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे.
भारतीय-अमेरिकन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि देशामध्ये सौहार्ज टिकवण्यासाठी या सर्वांना भारतात परत पाठवणे हा एकच पर्याय आहे. प्रत्येक भारतीयाला अमेरिकेतून डिपोर्ट केलं गेलं पाहिजे.
दरम्यान, अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर श्वेतवर्णीय हल्ले करणार नाहीत तर हे हल्ले आफ्रिकन-अमेरिकन, हिस्पॅनिक अमेरिकन आणि पाकिस्तानी वंशाचे लोक करतील. प्रसारमाध्यमे अशा गुन्ह्यांना लपवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे भारतीयांना निर्वासित करणे हा यावर एकच पर्याय आहे.