15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 00:55 IST2025-06-27T00:53:50+5:302025-06-27T00:55:23+5:30

बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे.

Gaza war will end in 15 days Who will rule in Hamas' place now Netanyahu-Trump take big decision | 15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

मध्यपूर्वेतील तणाव आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. येथील आणखी एक युद्ध लवकरच संपुष्टात येणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा युद्ध संपवण्यास सहमती दर्शविली आहे. बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे.

हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? -
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले गाझा युद्ध दोन आठवड्यांत संपवण्यासंदर्भात ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी फोनवरून चर्चा करत सहमती दर्शविली आहे. महत्वाचे म्हणजे, यानंतर इस्रायलच्या नेतृत्वाखाली युएई आणि इजिप्तच्या सहकार्याने गाझामध्ये सरकार चालवले जाईल," असा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे.

हमास गटाच्या नेत्यांना देशातून बाहेर काढले जाईल - 
हमास समूहाच्या नेत्यांना देशातून बाहेर काढले जाईल आणि सर्व बंदीवाणांना मुक्त केले जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजरायलचे पंतप्रधान पीएम बेंजामिन नेतन्याहू यांच्यात सोमवारी (23 जून 2025) चर्चा झाली. संबंधित वृत्तानुसार,  सौदी अरेबिया-सीरिया इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करतील आणि इतर मुस्लिम देशही असेच करतील.

50 हजारहून अधिक जणांचा मृत्यू - 
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. यानंतर, इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केली. जी अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात, गाझामध्ये युद्धविरामासाठी आपण नव्याने प्रयत्न करू,असे कतारने मंगळवारी (२४ जून २०२५) म्हटले होते. दरम्यान, इस्रायलच्या लष्करी कारवाईत आतापर्यंत किमान ५६,१५६ लोक मारले गेले असल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Web Title: Gaza war will end in 15 days Who will rule in Hamas' place now Netanyahu-Trump take big decision